सोमवार, ३० जानेवारी, २०१२

" प्राचीन मंत्र , तंत्र ,यंत्र वीद्येचा आधुनिक शिक्षाणात उपयोग "

शीर्षक वाचुन वाचकास आसे वाटेल कि प्राचिन विद्येचा आधुनिक शीक्षणात कसाकाय उपयोग होइल ? परन्तु प्रत्यक्षात हे सत्य आहे कि कोणत्याही प्रकारच्या नव्या सुधारणा किवा आविष्कार मग ते साहीत्यिक आसो वा वैज्ञानीक आसो, कुठल्याही क्षेत्रात पूर्वीच्या उपलब्ध ज्ञानातील उपयुक्त गोष्टीत भर घालुनच प्रगती झाली  आहे. ही प्राचिन साधने कशी अद्यावत आहेत ह्याची जणिव करून देण्यासाठी हा लेख कै. नागोराव बासरकर ह्यानी हिन्दीत लिहला व मी तो भाषान्तरीत करुन आपल्या पर्यन्त पोहोचवीत आहे.  हा लेख   आपणास माहिती पर होईल ही आशा ..........


मंत्र ,तंत्र , यन्त्र ह्या योग प्रकारा विषई काही गैर समज असतिल तर ते दुर व्हावे व आधुनिक शिक्षण शास्त्रातील लोकाना ह्याची माहीती व्हावी व ह्याचा विविध शाखा मध्ये कसा उपयोग होईल ह्याची जाणीव करुन ध्यावी व शीक्षण प्रसारासाठी त्याचा उपयोग व्हावा ह्या एकमेव उद्देशाने हा लेख लीहीण्याचा प्रपंच.........




तंत्र  , मंत्र व यंत्र हे तीन योगाचे प्रकार आहेत. मांड़ी घालून प्राणायाम करणे किवा विविध प्रकारचे शारीरीक आसने करणे म्हणजेच योग नव्हे . श्रीमत भगवतगीतात जो एक सर्व मान्य योग शात्राचा ग्रंथ आहे ,त्यांत योग ह्या शब्दाची व्याख्या खालील प्रमाणे केली आहे.




" योगः कर्म सुकौशलं "

अर्थ : कोणतेही विशिष्ट उद्देश पूर्ण कार्य कुशलता पूर्वक करणे म्हणजेच योग .ज्ञानाचा प्रसार करणे हे उद्दिस्ट कार्य आहे, त्या ज्ञानाचा झरा बुद्धिवान,साधरण तसेच मंदबुद्धी सर्वच प्रकारच्या विद्यार्थीना सहज साध्य व सुगम कसा होईल हे बघणे क्रम प्राप्त होईल .


असा उद्देश सफल होण्या साठी ज्या पद्धतीची मदत घेवून अध्यापक वर्ग व विदयार्थी दोघांनाही सोपे जाईल ती पद्धत म्हणजेच "योग" .


वास्तविक आपण विद्यार्थीना बुद्धिवान , साधारण ,किवां मंदबुद्धी यांत वर्गीकरण करतो हेच मुळात चूक आहे . कारण प्रत्येक प्राणीमात्रा मध्ये भगवंतानी बुद्धी दिली आहे तर, विद्यार्थीना ती नसेल हे कसे श्यक्य आहे.


खरे तर प्रत्येक विद्यार्थात हृदय ,मन , आणि बुद्धी असतेच पण ,कुणा मध्ये एक अंग अधिक आसतो तर दुसऱ्यात दुसरे अंग ईतर दोन्ही अंगा पेक्षा अधिक असतात .


काही व्यक्तीच्या ( आयुर्वेदानुसार ) प्रकृती मध्ये जलतत्व अधिक असते त्यांस आपण बुद्धिवान मानतो . तर काहीं व्यक्ती मध्ये वायूतत्व प्रभावी आस्ते त्यास वात प्रकृती किवां भावना प्रधान मानतो. काहीं व्यक्ती मध्ये पित्त तत्व ( अग्नी ) याचे प्रमाण जास्त असते आशांना पित्तप्रकृती किवां कर्म प्रधान म्हणता ऐईलं.


ह्यां तीनही प्रकारच्या विध्यार्थाकरिता शिक्षण पद्धती मध्ये तीन निरनिराळ्या पद्धतीत शिक्षण द्यावे. त्या म्हणजे मांत्रिक, तांत्रिक व यांत्रिक पद्धत .बुद्धी प्रधान व्यक्ती साठी " यंत्र पद्धत " ,भावना प्रधान व्यक्ती साठी " तंत्र पद्धत" व कर्म प्रधान व्यक्ती साठी " यंत्र पद्धत " ,ह्या योग्य व पोषक ठरतिल व  त्या, त्या व्यक्तींना तें सहज साधता ऐईल.


जर आध्यापकांनीआपला विषय शिकवताना प्रसंगानुसार मंत्र, तंत्र, व यंत्र ह्या तिन्हीचा उपयोग करून आपला विषय शिकविला तर, वर्गातील सर्व विद्यार्थाना सहज समजावता यतो .


यंत्र, मंत्र,व तंत्र म्हंटल कि लोकांची एक चमत्कारिक व अज्ञानाची भावना झालेली आहे . मंत्र मोठ्याने उच्चारून हवेत फुंकर मारली कि स्वतः काहीही न करता काम आपोआप होऊन जाईल .


तसेच तंत्रा प्रमाणे नुस्ती क्रिया म्हणजे सर्व काहीं झाले .


उदा : गणपतीला मोदकाचं नैवेंद्य दाखविला म्हणजे आपण परीक्षा पास होऊ .


ऐखादे यंत्र ( ताईत, गंडे , दोरे , ई. ) गळ्यात किवां दंडावर बाधले कि कोणी अज्ञात भूत, देव स्वतः च कार्य सिद्धीस नेईल.हें किवां आशा प्रकारचे विचार खरोखर बुद्धिहीन बनून अंध श्रद्धेच्या खोल सागरात बूडून टाकतात . म्हणून आशा विचारांचा त्याग करून तंत्र ,मंत्र व यंत्र ह्याची माहिती आणि आभ्यास करावा व त्याची व्याख्या समजून घ्यावी व्याख्या व विवरण थोडक्यात आसे आहे .


तंत्र :----


संस्कृत भाषेत " तन " = ताणणे ( विस्तार करणे ) ह्या धातू पासून " तंत्र " शब्द बनला आहे. आर्थात कुठल्याही विषयाचे विस्तार पूर्वक विवेचन करणे किवां संकुचित ( सारांश ) करून मांडणे,


म्हणजेच " तंत्र " होय .


उदा :-- एखाद्या छवि (फोटो ) ची महाप्रत ( एन्लार्ज ) करणे किवां एखाद्या इमारतीचा हुबेहूब प्रतिकृती ( मॉडेल ) तयार करून दाखविणे.




मंत्र :---


"मन" धातूचा अर्थ मनन किंवा चिंतन. मंत्राची व्याख्या संस्कृतात आशी आहे.


" मन्नत त्र्यायते इति मंत्रः "

ज्याच्या चिंतनाने कार्य सिद्धी होते त्यासच "मंत्र" म्हणतात .


उदा :-- रस्ता पार करण्याचे नियम (मंत्र) " फर्स्ट हाफ लुक टु द राईट,सेकण्ड हाफ लुक द लेफ्ट "


रस्ता ओलांडताना रस्त्याचा आर्धा भाग पार करण्या पूर्वी उजवीकडून यणारे वाहन नीट बघून मगच रस्ता ओलांडा आणि रस्त्याचा  पुढील आर्धा भाग ओलांडताना डाव्या बाजूने वाहन येत नाही ना ह्याची खात्री करूनच मग रस्ता पार करावा . हा "मंत्र" सर्वांनी नीट पाळला तर अपघात न होता रस्ता पार करू. अर्थात ह्या मंत्राचे सतत मनन  ,चिंतनाने  इच्छित फळ प्राप्ती होऊ शकते. इथे रस्ता सुखरूप पार करणे ही फल प्राप्ती.


यंत्र :----


कर्म प्रधान व्यक्तीना मात्र प्रत्यक्ष कृती पाहिल्यावरच समाधान होते. प्रत्यक्ष कृती करून दाखविणारे साधन म्हणजेच "यंत्र " होय.


उदा :---- पिवळा व निळा रंग ह्याचे मिश्रण केल्यास हिरवा रंग तयार होतो.


काचेचे दोन तुकडे एक पिवळा व दुसरा निळा एकत्र केल्याने हिरवा रंग दिसतो हें एक साधन (यंत्र) आहे. आता ह्या मंत्र, तंत्र, व यंत्र चा आधुनिक शिक्षणात विविध विषय शिकविताना व निट आकलन होण्या साठी कसा उपयोग होऊ शकतो व कसा केला आहे पाहू.




तंत्र पद्धतीचे उपयोग ;----


१) लेखन किवां अक्षरे ( आकडे ) वाचायला शिकण्यासाठी चिंचोके, काचेचे तुकडे किवां सीताफळाच्या बिया यांचा उपयोग करणे .


२) गणितात- लघुतम साधरण विभाजक ऐवजी ( लं. स. वि. ) व महत्तम साधारण वीभाजक ऐवजी (म.स.वि.) लिहिणे.


३) विज्ञानात - मग्नेशीयम =Mg . कॉपर (तांबे) =Cu , मर्क्युरी (लोह ) = Hg तसेंच फेरस ( लोह ) =Fe आसे संक्षेपात लिहणे.


४) भूगोलात- मोठ्या किवां विस्तृत भूभागाचा नकाशा /आराखडा ( चार्ट ) काढून शिकवणे हें एक तंत्रच आहे.


५) इतिहासात - एका विशिष्ट काल खंडात दोन निरनिराळ्या देशात उदा; भारत व इग्लंड यांत कोणत्या घटना घडत आहेत, ह्याची तुलनामत्क रित्या माडणे आणि त्या नुसार इतिहासाचे सामाजिक /राजकीय जीवनाचे ज्ञान करून देणे हें ही तंत्रच आहे.




मंत्र पद्धतीचे उपयोग :----


१) भाषा विषय - अन्वय लावण्याच्या पद्धती बाबत संस्कृतात येणे प्रमाणे वचन आहे.


 विशेषण पुरस्कृत्य विषेश्य तद नंतर /

कृतृ , कर्म,क्रिया युक्त एत दन्वरा लक्षणं //


अर्थ ;-- विशेषणाच्या नंतर त्याचे विषेष्य त्या नंतर कर्ता,कर्म , क्रियापद व नंतर त्याच्या विस्त बद्दल वर्णनं केल्या नंतर वाक्य रचना पूर्ण होते.


२) गणीतात ---- व्याज == मुळ x मुद्दल x दर भागिले १०० .


३) विज्ञान शास्त्रात ---- १) वेग = अंतर भागिले काळ .


२) इंद्रधनुष्याचे सप्त रंग ( v .i . b . g . y . o . r ) तांबडा ,नारंगी ,पिवळा हिरवा,निळा , पारवा आणि जांभळा.


४) भूगोल विषयात ----- ऐखाद्दया भू भागाचे हवामान माहित होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे


अ) विषुव वृता पासून त्या स्थानाचे अंतर .


ब ) समुद्र सानिध्य.


क ) उंची


ड ) वायूची दिशा


ई ) पर्वताची दिशा.


प ) पावसाचे प्रमाण .


ड ) जंगल .


व ) जमिनीचे प्रकार .


ह्या आठ गोष्टीचे आद्याक्षर एकत्र केल्याने एक मंत्र तयार होतो जसे --


" वि . स . उं .वा . प . पा . जं . ज . "


ह्या मंत्राच्या सह्याने कोठल्याही स्थानाचे हवामान माहित होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.




यंत्र पद्धतीचे उपयोग :---


1) भाषा विषय शिकविताना ---


शिशु कुंजात (बालवाडीत) मुलांना ऐखाद्या जनावराचे किवा वस्तुचे चित्र पुठ्यावर चिटकवतात व त्याच्या नावांत जेवढी अक्षरे असतात ती वेगवेगळ्या तुकड्यात कापतात. या सर्व तुकड्यांना एकत्र मिळवल्याने अक्षर किवां चित्र तयार होते .हीच आहे यांत्रिक पद्धत.


उदा :-- लेखणी ---- / ले / ख / णी /


२) गणित ---- महिन्याचा पगार माहीत असेल तर प्रति दिवसाचा पगार काढण्याचा तक्ता किवां भारतीय चलन किवां परदेशीय चलनाचे सम मुल्य दाखविण्याचे कोष्टक म्हणजेच यंत्र होय .


३) विज्ञान-शास्त्रात -------- छोट्या शक्तीने मोठे ओझे उचलले जाऊ शकते .


         ओझे( Load )------------ काठी +टेकू ( Fulcrum ) ------------ शक्ती




टीप :--- ही यंत्राची आकृती आहे व ह्यात काठी ,टेकू हें ह्या यंत्राचे भाग आहेत.


४) तर्क -शास्त्र --------- वाद विवादात विजय प्राप्त करण्याचे यंत्र.


सर्व घागरीत दुध आहे. (अ ) ------- विरोधी -------- ( ई) सर्व घागरीत दुघ नाही .






विसं वादी




काही घागरीत दुघ आहे. ( एं ) ------ विरोधी -------- ( ओ ) काही घागीत दुध नाही




स्पष्टीकरण :


अ) विधीरूप सर्वगत सिद्धांत .


ई ) निषेध रूप सर्वगत सिद्धांत


ए) विधीरूप एक देशीय सिद्धांत.


ओ) निषेध रूप एक देशीय सिद्धांत.


टीप :----- हें नक्की लक्षांत आसू द्या कि वाद विवादात विसं वादी सिद्धांत सिद्ध केल्यानेच विजय तुमचाच आहे. म्हणून प्रतिवादीच्या विसंवादी सिद्धांत सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करावा. आश्या प्रकारे विविध विषयात यंत्र शाश्त्राचा उपयोग यशस्वी रीतीने करता येतो.


योग शास्त्र मंत्र, तंत्र , यंत्र अनेक विध योगांची माहिती सांगते कि जी मानवी जीवनात प्रत्येक शाखे मध्ये उपयुक्त ठरू शकते. ह्या योग प्रकाराचा विविध विषय शास्त्रात उपयोग केल्यास त्याचा ज्ञान प्रसारासाठी अवश्य उपयुक्त ठरेल.


शिवाय ह्या योगें एका प्राचीन भारतीय शास्त्राची तोंड ओळख होऊन, ह्या शास्त्रा बद्दल समाजात आवड निर्माण झाली तरी सार्थक झाले.






माधव नागोराव बासरकर.


१५-८-२०१० .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: