शनिवार, १४ जानेवारी, २०१२

मकर संक्रांत ........१४ जानेवारी

Makar Sankranti







मकरसंक्रांत भारतीय हिंदुंचा एक मोठा सण आहे. हा सण भारताच्या बऱ्याच राज्यात साजरा केला जातो तसेंच जगातील काहीं देशात सुद्धामोठ्या आनंदाने व उत्साहात   साजरा करतात. 

हा सण भारतात बिहार,बंगाल , पंजाब, महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान, आणि तामिळनाडू राज्यात मोठ्या आनंदाने व मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो.


Makar Sankranti Greetings, Makar Sankranti scraps, Makar Sankranti wishes



भारता बाहेर ही ह्या सणाला मोठे महत्व दिले गेले आहे. नेपाल  मध्ये " माघी " किवां "माघी संक्रांति "
थांईलंड मध्ये हा सण " सोंगकरण' आणि मायनामार मध्ये " थिंग यान " या नावाने जल्लोषात  साजरा केला जातो.

 
 
 
Makar Sankranti History
 
 
 
संक्रांत हा सूर्याचे संक्रमण दक्षिण दिशा ते उत्तर दिशे कडे होतें हिंदू परंपरेनुसार आणि समजेनुसार जवळ जवळ ऐकून १२ अशी संक्रांती आहेत. पण फक्त मकर संक्रांतिच साजरी केली जाते कारण सूर्य "धनु " राशीतून " मकर " राशीत प्रवेश करतो. 
 
 
 
  



*************  मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा   ************* 


 
 
 

Makar Sankranti Greetings, Makar Sankranti scraps, Makar Sankranti wishes

 

मकर संक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र हें समान असतात आणि ह्या नंतर दिवस मोठा व उष्ण असतो आणि रात्र लहान . आर्य लोक पूर्वी अतिमाहन दिवस म्हणून साजरा करीत असत. महाभारत काळात पण हा दिवस अती महत्वाचा व शुभ दिन मानला जाई कारण ह्या दिवशी जर कोणास मरण आले तर तो मोक्षास जातो. पितामह भीष्म शरपंजरी होतें तेव्हां ह्या दिवशाची म्हणजे उत्तरायण येण्याची वाट पाहत आपले मरण ढकले कारण मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून.  


Makar Sankranti Greetings, Makar Sankranti scraps, Makar Sankranti wishes



महाराष्ट्र राज्यात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो ह्या दिवशी तीळ आणि गुलानी बनविलेले पदार्थ आपली नातेवाईकास व मित्र मंडळीना देतात व म्हणतात " तीळ गुळ घ्या गोड गोड बोला " ह्या दिवशी आकाशांत पतंग पण उडवून आनंद लुटतात .



                                         तीळ -गुळाचे लाडू  व साखरेचा  हलवा



                                                        

                                                             तीळ -गुळाचे लाडू


गुजरात मध्ये तर जागतिक पतंग उडविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. उत्तर प्रदेशात खिचडी "गरिबांना वात्लीजते तर आंध्रा मध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा करतात व गरिबांना तिळगुळाचे पदार्थ वाटण्यात येते. ह्या दिवशी पवित्र गंगे मध्ये स्नान करणे म्हणजे मोक्ष प्राप्ती होतें असा एक समज आहे म्हणून बरेच लोक ह्या दिवशी गंगा स्नान करतात.

                                             पतंगाची रांग .


तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश ह्या दोन्ही राज्यात हा सण " पोंगल " म्हणून साजरा करतात तो तीन दिवस १३ ते १५ जानेवारी . १३ ला "भोगी " १४ ला " संक्रांति " व १५ ला तमिळ लोक " मट्टू पोंगल "
तर आंध्रातील लोक " कानुमा " साजरा करतात.

कर्नाटका राज्यात मुले,बायका, पुरुष नवीन वस्त्र परिधान करून आपल्या नातेवाईकाना तिळ,गुळ ,खोबर, शेगदाणे, ह्यांचे मिश्रण करून वाटतात. खेड्यात तर शेतकरी आपलें बैल तसेंच गाईना स्वछ
धुतात   व  त्यांना वेगवेगळ्या रंगानी व वस्त्रानी सजवून त्यांची पूजा करतात व वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढतात.

=========================================================================


सर्व माहिती आणि छायाचित्रे संग्रहित.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: