शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

नारळी पौर्णिमा ( श्रावण शुद्ध पौर्णिमा )


नारळी पौर्णिमा  ( श्रावण शुद्ध पौर्णिमा )
राखी पौर्णिमा ( रक्षा बंधन ) / श्रावणी



नारळी पौर्णिमा :--- 





प्रामुख्याने  हा सण समुद्रकाठी राहणारे कोळी  बांधव साजरा करतात. वर्षाऋतूत समुद्र खवळलेला असतो व त्यामुळे कोळी बांधव मासेमारी साठी आपली बोटी समुद्रात घेऊन जात  नाहीत तसेंच जहाजे  सुद्धा नागरून ठेवतात. समुद्रदेवतेचा कोप होऊ नये व सर्व नौकां, जहाजे, बोटी सुरक्षित राहाव्यात आणि समुद्र शांत राहावा म्हणुन त्याची  पूजा
केलीजाते. जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कोळी लोक नारळ अर्पण करतात.  











राखी पौर्णिमा ( रक्षा बंधन ) :---




हा दिवस रक्षा बंधन म्हणुन साजरा होतो. ह्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व आपले रक्षण भावाने करावं असा या राखी बांधण्या मागचा हेतू असतो.
नेमका रक्षाबंधनाचा हा पवित्र सण कधीपासून साजरा होतो याची माहिती उपलब्ध नाही पण पुराणात अशी कथा आहे की, "पुर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला.
त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले". त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.
बहीण भावाच्या अतूटप्रेमाची आठवण नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात.  या विधीस "पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.




येनबद्धो बलिराजा दानवेन्द्र: महासुर:  /  
तेन त्वां प्रतिबद्ध नामि रक्षो मा चल मा //











श्रावणी ( श्रावण शुद्ध पौर्णिमा ) :---



                                                 यज्ञोपवीत  ( जानवे )





श्रावणी म्हणजे यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करण्याचा विधी. हा विधी श्रवण नक्षत्रावर करावं . असे सर्वजण ज्यांचे उपनयन ( मोंज्य ) झालेले आहे त्यांनी एकत्र येऊन हा विधी करावा ह्यांत प्रथम शरीरशुद्धीसाठी पंचगव्य  प्राशन करावे  नंतर गणपतीपूजन, होम, ब्रम्हयज्ञ,भस्म स्नान ,गोमय स्नान , मृतिका स्नान व शुद्धजल स्नान करावे. सप्तऋषींची पूजा करावी आणखी एक होम करावा ज्यांत सातूच्या पिठाच्या  २१ आहुत्या द्याव्या. प्रत्येकाने २ गोळ्या  ( सातूच्या )पाण्याबरोबर दातास न लागता भक्षण करावे.








गायत्री जप करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे. ब्राम्ह्चार्याने १ यज्ञोपवीत तर गृहस्ताने २ धारण करावीत.  


------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रे गुगल इमेजसच्या सौजन्याने .... 
(माहिती संकलन: विकिपेडिया)