आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण " भ्रष्टाचार निर्मुलन " साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत " ड्राफ्ट कमेटी " ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .
आता हेचं बघा ना ?....... भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जन-सामान्या पर्यन्त पोहचविण्याचे काम आण्णा व त्यांचे समविचारी साथीदारांनी केला. या आंदोलनाची आग संपूर्ण भारतभर पसरली व प्रतिक्रिया सर्वत्र दिसून आली. हें बघून भ्रष्ट नेते मंडळीना धोक्याची घण्टा दिसू लागली व सरकारने थोडे नरमाईचे धोरण आखून आपली नवी खेळी खेळण्यास सुरवात केली.
स्वातंत्र पूर्व काळात व नंतर सर्वच पक्षातील नेते मंडळीचा जनमाणसात प्रभाव होता तो त्यांची देशभक्ति, सचोटी, लोकासाठी काहीं करण्याची जिद्द त्यांच्या ठाई असल्यामुळे. आणि आतां स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली आणि पहा सगळ्याच राजकीय पार्टीचे कोणत्या प्रकारचे नेते मंडळी आहेत? खेद वाटते कि इतकी वर्षे राज्य करून काय दिले जनतेस ? मतांची नीच राजनीती ,पैसा.शक्ती ( गुंडगिरी ) च्या जोरावर आपले उखळ पांढरे करीत आहेत.
अश्या राजकारणा मुळे सुशिक्षित वर्ग ह्यात भाग घेईनासा झाला व एक प्रकारची उदासीनता ,न्यूनगंड ने पछाडला गेला आहे. एकीकडे लोकसंख्या वाढत चालली तसेंच गरिबी पण वाढली . अशिक्षित लोकांची संख्या इतकी जास्त वाढली कि हें नेते मंडळी त्यांना आपले 'वोट बँक' समजू लागली आणि निवडणूक काळात पैसा, मादक पेये , गुंडगिरीच्या जोरावर मते मिळवून निवडणूक जिंकू लागली.
भारतीय राज्य घटनेने दिलेले अधिकार आपल्या अंकित करून स्वहितासाठी वापरू लागली आहेत. अशा नेत्यांना " जन- लोकपाल बिल " जर, जन सामन्याच्या इच्छे प्रमाणे पारित झाले तर काय होईल ह्याचे यानां पुरेपूर कल्पना आहे . आणि म्हणूनच जनतेच्या बाजूने " जन-लोकपाल बिल " ची मांडणी, व्यवस्थापन, अधिकार, व कक्षा अश्या सर्व बाजूवर विचार करण्यास निवडली गेलेली तज्ञ प्रतिनिधी मंडळी जनतेचि बाजू व मत मांडण्यासाठी सर्व ताकदी ने सज्य झाली. सरकारातील नेते मंडळींनी नव्या खेळी नुसार ह्या जन प्रतिनिधींचे चारित्र्य हनन करण्यास सुरवात केली. कां तर जर हें ड्राफ्ट, पुढे विधेयक पास झाले तर त्याचे कायद्यात रुपांतर होईल जें ह्या भ्रष्ट नेत्यास परवडणारे नाही .
कपिल सिब्बल.दिग्विजयसिंग व राजा अमरसिंग ( काँग्रेसचा जवळचा मित्र ) यांनी आपले ठरवुन दिलेले काम करण्यास सुरवात केलीच आहे. जन प्रतिनिधी भूषण पिता आणि पुत्र, श्री हेगडे,व आण्णा हजारे ह्यांचावर आरोपांवर आरोप करीत आहेत. त्यांचे एकच लक्ष जनमाणसात असलेली ह्या लोकाची प्रतिमा मलीन व्हावी व ही मंडळी कशी योग्य नाहीत प्रतिनिधित्व करण्यासाठी हे दाखवून द्यावे कि ज्या मुळे लोक चर्चा वाढेल व चालू झालेल्या बैठकीवर परिणाम होऊन ह्यास खीळ बसेल व निस्चित केलेल्या समया मध्ये विधेयक पारित होणार नाही.
तर....ही चिखलफेक काय दर्शविते ? ही तर एक केविलवाणी धडपड आहे नाही का ? म्हणूनच दुतोंडी धोरण राबवीत आहेत. एकीकडे दाखवायचे कि आम्ही जनतेसाठी हें लोकपाल बिल पारित करू तर दुसरी कडे हें कसे मोडीत काढता येईल कारण, हें विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात पारित करावयाचे आहे. जर त्यांच्या खेळी मुळे व्यत्यय आलाच तर बरेच फावेल व ईतर विधेयकाचे जें झाले ह्याचे पण तेचं होईल ह्यात शंका नाही.
आता वेळ आली आहे कि अश्या प्रकारच्या माकडउड्या मारणाऱ्याना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे.
जनमाणसात ह्या खेळीची चीड पसरली पाहिजे. सामजिक सेवासंस्था, प्रसार माध्यमे, व सोशल ग्रुप्स, ह्या सर्वांनी मिळून अशा विघ्न संतोषी ताकदीचा मुकाबला करण्यास एका नव्या जनांदोलनचा संदेश सर्वाना द्यावा व त्या योगें खीळ घालणाऱ्या लोकांस कळूद्या " जन-क्षोभ " तो कसा असतो तो........
आता वेळ आलेली आहे या जन मतांच्या अश्वावर आरुढ होउन सर्व भारतातिल सुजाण नागरिकानी एक होउन ह्या गलिच्छ राजकाराणास समोरे जाउन ताकदिने लढा द्यावा. जी सुशिक्षित ,मध्यम वर्गीय, श्रीमंत वर्ग मतदान प्रक्रिये पासुन इतकी वर्षे दुर रहिला त्यानी व इतर समविचारी लोकानी एकत्र येउन एक नवा पक्ष स्थापन करावा व निवडनुक प्रक्रियेत भाग घ्यावा .
जेणे करुन या निरढावलेल्या राजकारण्याना त्यांच्याच शत्राने नामोहरम करता येइल. जसे म्हणतात ना विषला विषच मारु शकते, त्याच प्रकारे आजच्या राजनीतिला ज्यास हे नेते मण्डळी स्वताहाचे मण्डलीक मानुन त्यास हावी तशी दिशा देतात व स्वार्थ आणि खुर्ची टीकवतात. ह्या राजनितिच्या आखाड्यात उतरुन त्याना प्रत्युत्तर देण्याची खरी गरज आहे.
शेवटी काय तर" सावधान" आपले ध्येय गाठणे हें म्हत्वाचे नाही कां ?
,,,,,,,,उठा........लढा ........लढा
अण्णांनी उपोषण सोडले व जाहीर झाले कि एका ठरावीक वेळेत " ड्राफ्ट " तय्यार करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधेयक माडणे व ते पारित करणे ह्यावर सरकार व आंदोलनकरते समाजवादी यांच्यात एकमत झाले. आता वाटले कि सर्व गोष्टी मार्गी लागतील पण ...कसचे काय ?.......
आता हेचं बघा ना ?....... भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जन-सामान्या पर्यन्त पोहचविण्याचे काम आण्णा व त्यांचे समविचारी साथीदारांनी केला. या आंदोलनाची आग संपूर्ण भारतभर पसरली व प्रतिक्रिया सर्वत्र दिसून आली. हें बघून भ्रष्ट नेते मंडळीना धोक्याची घण्टा दिसू लागली व सरकारने थोडे नरमाईचे धोरण आखून आपली नवी खेळी खेळण्यास सुरवात केली.
स्वातंत्र पूर्व काळात व नंतर सर्वच पक्षातील नेते मंडळीचा जनमाणसात प्रभाव होता तो त्यांची देशभक्ति, सचोटी, लोकासाठी काहीं करण्याची जिद्द त्यांच्या ठाई असल्यामुळे. आणि आतां स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली आणि पहा सगळ्याच राजकीय पार्टीचे कोणत्या प्रकारचे नेते मंडळी आहेत? खेद वाटते कि इतकी वर्षे राज्य करून काय दिले जनतेस ? मतांची नीच राजनीती ,पैसा.शक्ती ( गुंडगिरी ) च्या जोरावर आपले उखळ पांढरे करीत आहेत.
अश्या राजकारणा मुळे सुशिक्षित वर्ग ह्यात भाग घेईनासा झाला व एक प्रकारची उदासीनता ,न्यूनगंड ने पछाडला गेला आहे. एकीकडे लोकसंख्या वाढत चालली तसेंच गरिबी पण वाढली . अशिक्षित लोकांची संख्या इतकी जास्त वाढली कि हें नेते मंडळी त्यांना आपले 'वोट बँक' समजू लागली आणि निवडणूक काळात पैसा, मादक पेये , गुंडगिरीच्या जोरावर मते मिळवून निवडणूक जिंकू लागली.
भारतीय राज्य घटनेने दिलेले अधिकार आपल्या अंकित करून स्वहितासाठी वापरू लागली आहेत. अशा नेत्यांना " जन- लोकपाल बिल " जर, जन सामन्याच्या इच्छे प्रमाणे पारित झाले तर काय होईल ह्याचे यानां पुरेपूर कल्पना आहे . आणि म्हणूनच जनतेच्या बाजूने " जन-लोकपाल बिल " ची मांडणी, व्यवस्थापन, अधिकार, व कक्षा अश्या सर्व बाजूवर विचार करण्यास निवडली गेलेली तज्ञ प्रतिनिधी मंडळी जनतेचि बाजू व मत मांडण्यासाठी सर्व ताकदी ने सज्य झाली. सरकारातील नेते मंडळींनी नव्या खेळी नुसार ह्या जन प्रतिनिधींचे चारित्र्य हनन करण्यास सुरवात केली. कां तर जर हें ड्राफ्ट, पुढे विधेयक पास झाले तर त्याचे कायद्यात रुपांतर होईल जें ह्या भ्रष्ट नेत्यास परवडणारे नाही .
कपिल सिब्बल.दिग्विजयसिंग व राजा अमरसिंग ( काँग्रेसचा जवळचा मित्र ) यांनी आपले ठरवुन दिलेले काम करण्यास सुरवात केलीच आहे. जन प्रतिनिधी भूषण पिता आणि पुत्र, श्री हेगडे,व आण्णा हजारे ह्यांचावर आरोपांवर आरोप करीत आहेत. त्यांचे एकच लक्ष जनमाणसात असलेली ह्या लोकाची प्रतिमा मलीन व्हावी व ही मंडळी कशी योग्य नाहीत प्रतिनिधित्व करण्यासाठी हे दाखवून द्यावे कि ज्या मुळे लोक चर्चा वाढेल व चालू झालेल्या बैठकीवर परिणाम होऊन ह्यास खीळ बसेल व निस्चित केलेल्या समया मध्ये विधेयक पारित होणार नाही.
पण...कोणी तरी ह्याना विचारा कि बाबा तुमच्यातला ( सरकारी प्रतिनिधी ) कोण असा स्वच्छ आहे कि ज्याने आपल्या आयुष्यात नीतीला सोडून काहीच केले नाही ?.........ह्या बरबरटलेल्या भ्रष्ट चिखलात एखादा असा नेता आहे कां ज्याच्या अंगावर एक पण शिंतोड उडालेला नाही ? शोधाल तरी सापडणार नाही हें निश्चित कारण सर्वच राजकीय व्यवस्था अशी झाली कि त्यातून कोणीही सुटू शकत नाही.
तर....ही चिखलफेक काय दर्शविते ? ही तर एक केविलवाणी धडपड आहे नाही का ? म्हणूनच दुतोंडी धोरण राबवीत आहेत. एकीकडे दाखवायचे कि आम्ही जनतेसाठी हें लोकपाल बिल पारित करू तर दुसरी कडे हें कसे मोडीत काढता येईल कारण, हें विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात पारित करावयाचे आहे. जर त्यांच्या खेळी मुळे व्यत्यय आलाच तर बरेच फावेल व ईतर विधेयकाचे जें झाले ह्याचे पण तेचं होईल ह्यात शंका नाही.
आता वेळ आली आहे कि अश्या प्रकारच्या माकडउड्या मारणाऱ्याना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे.
जनमाणसात ह्या खेळीची चीड पसरली पाहिजे. सामजिक सेवासंस्था, प्रसार माध्यमे, व सोशल ग्रुप्स, ह्या सर्वांनी मिळून अशा विघ्न संतोषी ताकदीचा मुकाबला करण्यास एका नव्या जनांदोलनचा संदेश सर्वाना द्यावा व त्या योगें खीळ घालणाऱ्या लोकांस कळूद्या " जन-क्षोभ " तो कसा असतो तो........
आता वेळ आलेली आहे या जन मतांच्या अश्वावर आरुढ होउन सर्व भारतातिल सुजाण नागरिकानी एक होउन ह्या गलिच्छ राजकाराणास समोरे जाउन ताकदिने लढा द्यावा. जी सुशिक्षित ,मध्यम वर्गीय, श्रीमंत वर्ग मतदान प्रक्रिये पासुन इतकी वर्षे दुर रहिला त्यानी व इतर समविचारी लोकानी एकत्र येउन एक नवा पक्ष स्थापन करावा व निवडनुक प्रक्रियेत भाग घ्यावा .
जेणे करुन या निरढावलेल्या राजकारण्याना त्यांच्याच शत्राने नामोहरम करता येइल. जसे म्हणतात ना विषला विषच मारु शकते, त्याच प्रकारे आजच्या राजनीतिला ज्यास हे नेते मण्डळी स्वताहाचे मण्डलीक मानुन त्यास हावी तशी दिशा देतात व स्वार्थ आणि खुर्ची टीकवतात. ह्या राजनितिच्या आखाड्यात उतरुन त्याना प्रत्युत्तर देण्याची खरी गरज आहे.
शेवटी काय तर" सावधान" आपले ध्येय गाठणे हें म्हत्वाचे नाही कां ?
,,,,,,,,उठा........लढा ........लढा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा