प्रसिद्ध वैद्यानिक अल्बर्ट आइन्स्टाईन च्या पत्नीस वाटे कि आपल्या पतीला गणित येत नाही व तसेंच दिशे बद्दलचे ज्ञान अगदीच नाही असा समज होता. जेव्हा आइन्स्टाईन बाजार हाट व खरेदी करण्यास जात असत तेव्हा त्यांची पत्नी संपूर्ण खरेदीचा हिशेब करून व त्यांना समजावून सांगे आणि लिस्ट प्रमाणेच आणण्याची ताकीद पण देई इतकेच नाही तर त्यांच्या हातावर घराचा संपूर्ण पत्ता व दिशा बाण काढून न विसरण्याची ताकीद देत असे कारण तिच्या समजुती प्रमाणे ते विसराळू होतें आणि कदाचित घरचा रस्ता विसरतील म्हणून ही योजना करीत असे.
आइन्स्टाईन सारखा प्रसिद्ध संशोधक आपल्या पत्नीच्या नजरेत एक सामान्य माणूस ( पती ) ज्यास व्यवहार ज्ञान नसलेला अशी ठाम समजूत होती. ह्यात तिचा दोष नाही कारण आपण सर्वच परिवर्तनाला आत्मसात करण्यास किवां मान्यता देण्यास तयार नसतो.
या जगातील प्रत्येक माता आपल्या मुलास वाजवी पेक्षा जास्त स्वरक्षण देण्याचा आट्टहास करीत असते. तिला वाटते कि आपला मुलगा स्वरक्षण करू शकत नाही जरी तो मिलीट्रीचा कमांडर का असेना. त्या मातेच्या भावना अजून मुलगा दुध पिता आहे असेच असते. तोच मुलगा बापाच्या नजरेत व्यक्तित्व नसलेला तर पत्नीच्या नजरेत तो बुद्धिवान नसलेला असतो. अश्या प्रकारच्या समजुती ही प्रत्येकाची मनोवैद्यानिक स्थिती दर्शविते.
मित्रानो जर तुम्हास आयुषात सफलता प्राप्त करावयाची असेल तर स्वत:ला आपल्यात शोधा. आप्त ,विरोधी, स्वकीयांची पर्वा करू नका कारण हें लोक तुमच्यात जागृत झालेला नवा विचार किवां आधुनिक बदल घडण्याचा विचार स्वीकार करणार नाहीत. तुमच्यातला चांगला बदल किवां रूढी, परंपरा परे असलेला विचार व आचार त्यानां मान्य होणार नाही. हो काही लोक ह्या तथ्यास अपवाद असतीलच.
तरी पण आत्म विश्वासाने पुढे जात राहावे कारण जुनी मंडळी ही पूर्वग्रह दुषित विचारांचे शिकार झालेली आहेत. ते तुम्हास तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय देणार नाहीत कारण त्यांची ठाम समजूत असते कि जें काहीं आपण करीत आहात त्यातून चांगले निष्पन्न होणार नाही कारण नव्या बदलास सामोरे जाण्याचे त्यानां जमत नाही.
रामदास स्वामी लग्न मंडपातून पळाले नसते तर "स्वामी" घडलेच नसते. आपण पुढे तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपण नव्या लोकांच्या सानिध्यात जाऊ व ते लोक आपणास आपल्या तेव्हाच्या( वर्तमान ) परिचयाने स्वीकारतात. जुनी मंडळी आपणास जुन्या परीचयाशी ( ओळख ) जोडून पाहतात . आपण कितीही आटा पिटा केला त्यानां नव्या गोष्टीचा बदलाचा परिचय करून देण्यासाठी तरी ही मंडळी आपल्या जुन्या समजुतीवर ठाम असतात.
आपली बालपणची मित्र मंडळी पण विश्वास ठेवणार नाहीत कि आपल्यात बदल घडला व आपण गंभीर व उच्च विचार करणारे समजूतदार झालो कारण ते लहानपणी आपल्या ठायी असलेली उच्छश्रुखलेंच्या अनुषांघाने आपणाकडे बघत असतात आणि हैराण होतात कि हें असे कसे बरे बदल झाले ? खरें तर लहानपणा पासून त्यांच्या मनांत आपल्या बद्दल एक पक्की धारणा बनलेली असते व ते त्यातच गुरफटलेले असतात आणि त्याच पद्धतीने ते विचार करतात कारण ते दुसरा वेगळा विचारच करू शकत नाहीत.
जर पुढे जायचे असेल तर सर्व प्रथम प्रत्यकाने स्वत: ला नीट ओळखले पाहिजे .जीवना प्रति एक सूक्ष्म द्रष्टीकोन अंगी बाणवला पाहिजे. बरयाच वेळा असे होतें कि आपणास आत्म साक्षात्कार होतो पण ते स्वत: ला स्वीकार करणे कठीण जाते. आप्त, स्वकीयांच्या टीका किवां अभिनंदनाने कधी सुखाऊन जातो तर कधी दुखी: होतो कारण, ते आपणास त्यांच्या विचारा नुसार जाणत आसतात व ते तितकेच जाणतील जेवढी त्यांच्या विचाराची कुवत असते.
पुढे जाण्याचा मार्ग सतत शोधत राहावा व नव्या वाटे वरून जाण्यास मुळीच कच खाऊ नये. इतरांची त्यावेळी आपल्या बद्दलच्या धरणेचा विचार करू नये मग ते सकारात्मक किवां नकारात्मक असोत. आपण आपल्या धेय्याकडे लक्ष ठेऊन ते गाठण्याचा प्रयत्न करीत राहावे तरच अंतिम धेय्य साध्य होईल.
मा.ना.बासरकर.
०५-०४-२०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा