जर आपणास देवाने विचारले कि बालका तुला कुठल्या देशात जन्म घ्यावे
असे वाटते तर............जन्म घेण्यास जगातील चांगली आणि वाईट राष्ट्रे
आपणास कुठल्या देशात जन्म घेणे आवडेल कारण जगातील काही राष्ट्रे चांगली तर काही वाईट स्थितीत आहेत. ह्यावर Economist Intelligence Unit ने एक सर्व्हे केला आणि रिपोर्ट सदर केला . त्यांच्या प्रमाणे काही आश्चर्यकारक गोष्टी दिसुन आल्या अमेरिकेत जन्म घेण्या पेक्षा जगात १५ राष्ट्रे अशी आहेत कि ती अमेरिके पेक्षा उत्तम आहेत.
जगातील ८० देशांत पाहणी केली कि कोणता देश सर्व दृष्टीने जन्म घेण्यास चांगली आहेत .ज्या देशात चांगल राहणीमान, सामाजिक वातावरण, स्वास्थ्य सुविधा, आणि सुरक्षिता ह्या सर्व कसोटीवर अग्रगण्य असलेली राष्ट्रेच योग्य आहेत असा निर्वाळा या रीपोर्टातून मिळतो . खालील दिलेल्या जागतिक नकाशा वरून हे स्पष्ट होते
सर्व्हे करताना खालील निकषावर ह्या राष्ट्रांची कसोटी लावली गेली.
१ ) राजकीय स्वतंत्रता
२) स्वास्थ्य सुविधा
३) वित्तीय परिस्थिती.
४) नागरिकांचे राहणीमान .
५) स्त्री ,पुरूषाच प्रमाण
६) नौकारींची शाश्वता
७) गुन्हेगारीचे प्रमाण
८) पर्यावरण
आज जन्म घेतलेलं मुल सन २०३० मध्ये तरुण होईल आणि त्यावेळी त्याला कोणत्या प्रकारचे जीवनमान मिळेल ह्याचा विचार करून ह्या ८० देशांचा वरील सर्व निकषावर अभ्यास केला तेव्हा असे दिसून आले कि जगातील प्रगतीशील म्हणवणारी राष्ट्रे आणि ज्या देशांकडे सर्व जगातील लोकांचा असलेलेआकर्षण बघता ह्या रिपोर्ट मुळे निराशा होईल. खरे तर असे अनेक निकष राहून गेले असतील ज्यांना ह्या सर्व्हे मध्ये लक्षात घेतले गेले नाहीत. मानवी जीवन सुखी होण्यासाठी ज्या निकषांची गरज असते ते सर्व निकष व त्यांचे परिणाम ह्याचा विचार निश्चितच झाला आहे .
आपला सर्वकष आनंद फक्त पैसाच विकत घेवू शकत नाही हां पण २/३
भाग त्याच्या साह्याने मिळवू शकू.
पैसा आणि चांगले राहणीमान ह्यांची तुलना फक्त त्या देशाच्या GDP वर अवलंबून असते. कोणत्याही देशाचा GDP (पर क्यापिटा ) हेच दर्शविते कि त्या देशाची आणि तिथल्या जनतेची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे. आपण वरील आलेखात बघाल तर जगातील आर्थिक संपन्न देश पिछाडीवर आहेत ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिका, जर्मनी हे दोन्ही देश आज जगातील दोन बलाढय आर्थिक दृष्ट्या राष्ट्रे आहेत ते इथे १६ व्व्या स्थानावर आहेत . तसेच जपान तर २५ व्व्या स्थानावर इतकेच काय युनाईटेड किंग्डम व फ्रांस त्यांच्याही पेक्षा मागे आहेत.
मिडिल इस्ट देशांत आर्थिक सुब्ता असली तरी इतर कासोट्यावर ते तेवढे उतरू शकत नाहीत. सौदी अरेबिया, आणि इतर गल्फ देश हे त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या साठ्या मुळे श्रीमंत तर आहेत पण मानवी जीवन म्हणावे तितके सुदृढ व प्रसन्न वातावरणात नाही कदाचित त्यांच्याकडे असलेल्या कडक कायद्यामुळे किवा इजराइल ,अरब संबंधामुळे असेल ते २० आणि १८ व्व्या स्थानावर आहेत.
जगातील सर्वात चांगले देश जन्म घेण्यासाठी आहेत जे छोटे, शांततामय जीवन देणारे, एकसंघ , खर्या अर्थाने आपल्या नागरिकांना स्वतंत्रता दिली, व लवचिक लोकशाही ज्या देशांत नादते . जगातील असे १५ देश आहेत जे वरील सर्व बाबतीत परिपूर्ण आहेत ह्यांत सर्वात वरचा क्रमांक लोगतो तो स्वीझरल्यंड, ऑस्ट्रेलीया आणि नॉर्वे आणि त्यांच्या खालोखाल आयर्लंड ,नियुझीलंड आणि क्यानडा हे देश.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या यादीत येशिअन शहरे ह्यांचा पण समावेश आहे ती म्हणजे हाँग काँग ,सिंगापुर आणि तैवान. रिपोर्ट प्रमाणे जरी ही शहरे ह्या यादीत वरच्या क्रमांकावर असली तरी काही कसोट्यावर ही शहरे उतरत नाहीत हे ही खरे तरी पण त्यांना अग्रक्रम मिळाला. ही शहरे तशी श्रीमंत जरी असली तरी सिंगापूर मध्ये प्रजातंत्र नाही तरी ते ६ व्व्या क्रमांकावर आहे. तसेच तैवान आज मितीस तिथे राजकीय स्वतंत्रता व स्वास्थ्य सेवा चांगल्या प्रकारे तेथील जनतेस दिली जाते
पश्चिमी राष्ट्रे जगात अजूनही चांगल्या प्रतीचे आयुष देवू शकतात आणि
या राष्ट्रात जन्म घेणे केव्हाही चांगलेच.
आज मितीस एशियाई देश सर्व आघाडीवर प्रगती करीत आहेत तरी पण पश्चिमी देश आपल्या जनतेस राजकीय स्वतंत्रता ,स्वास्थ्य सेवा, जरी सध्या त्या देशांची आर्थिक व्यवस्था म्हणावी तितकीश चांगली नाही तरी तिथे जन्म घेणे चांगलेच से तज्ञांचे मत आहे. जागतिक क्रमवारीत पश्चिमी देश आघाडीवर आहेत व पोर्तुगाल,स्पेन ह्या देशांत थोडी बहुत अराजकता दिसते तरी पण रीपोर्ट आणि तज्ञांच्या मते आज ह्या देशात जन्मलेले मुलांचे भविष चांगलेच असेल पोलंड ,ग्रिस आणि ब्राझील चा हि समावेश आहे. तुर्की व चीन हे देश पण आपली स्थिती सुधारित आहेत.
गरिबी, वाईट राजकीय व्यवस्था, आणि जनतेस स्वातंत्र्य नाही असे देश
जन्म घेण्यास सर्वात वाईट आहेत असे तज्ञ म्हणतात.
ज्या देशांत अराजकता ,दंगे ,राजकीय व्यवस्था म्हणावितशी चांगली नाही आणि त्याच बरोबर गरिबी आहे असे सर्व देश क्रमवारीत खालच्या स्थरात आहेत. सर्वात शेवटच्या क्रमवारीत असणारे देश म्हणजे नैजेरीया, केनिया आणि यूक्रेन . शेवटच्या क्रमवारीत मोडणारे सर्वच देशांत गरिबी आहे असे नाहीत जसे रशिया पण राजकीय स्वातंत्र्य ,जनतेचे मुलभूत हक्क,व स्वास्थ्य सेवा यांचा अभाव जास्त जाणवतो .
इंडोनेशिया आणि वियतनाम जरी कूर्म गतीने आपली प्रगती करीत आहेत तरी आज ते गरीब देश आहेत. असे सर्व देश जे गरिबीतून,राजकीय व्यवस्थ सुधारणे, स्वास्थ्य सेवांचा अभाव असे सर्व देश जन्म घेण्यास चांगले नाहीत जर जन्म घेतलेच तर अजीवन संघर्षात काढावे लागतील.
भारताची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही क्रमवारीत ६६ व्व्या क्रमाकावर आहे. वरती दिलेया सर्व कसोट्या मध्ये भारतातील प्ररीस्थिती बघता नुसते प्रगतीशील राहून जमणार नाही तर राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ,गरिबी, राजकीय स्वातंत्र ,स्वास्थ्य व्यवस्था व राजकीय इच्छाशक्ती जो पर्यंत बदलणार नाही तो पर्यंत इथे आज जन्मलेल्या बालकाचे भविष हे संघर्षमय असेल .
असमानता आणि गरिबी हे जिथे आहे ते नुसत्या गरिबी पेक्षाही वाईट
परिस्थिती होय.
अंगोला, कझाकिस्तान आणि युक्रेन हे तिन्ही देश जरी थोड्या फार प्रमाणात प्रगती पथावर आहेत तरी तिन्ही देशात प्रचंड प्रमाणात असमानता आणि गरिबी असल्यामुळे अशांती व वारंवार जनतेचा उद्रेक होत असतो. तसेच सरकारची निष्क्रियता ,कायदे व सुव्यवस्था राखण्यात कमी पडत असल्यामुळे भ्रष्टाचार तिथे सर्व थरात रुजलेला दिसतो .कझाकिस्तान,अंगोला आणि युक्रेन अनुक्रमे ७४,७६ आणि ७८ स्थानावर आहेत.
सर्वात खालच्या क्रमांकावर असलेल्या देशां पेक्षा श्रीलंका ,वियतनाम, पाकिस्तान आणि सिरीया हे देश त्यामानाने वरच्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेत तमिळ टायगर उद्रेक तर वियतनाम मध्ये जुलमी राजवट ,पाकिस्तान मध्ये नावा पुरतेच प्रजाराज्य आहे आणि मिलिटरीचे जास्त वर्चस्व व स्वतंत्र झाल्या पासून अनेक वेळा कट करून लोकांचे राज्यशाशन उलथविण्यात आले तसेच दहशदवादाची जोपासना, आर्थिक परिस्थिती ह्या सर्व बाबी मुळे देशाचा क्रमांक ७५ व्वा लागला.
चीन हा देश सुद्धा जन्म घेण्यास चांगला मानला गेला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे जगातील अतिश्रीमंत लोकांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर असणारा देश चीन हा ४९ व्व्या क्रमांकावर आहे. खरेतर चीनची सर्वागीण प्रगती बघता ह्याचा वरचा क्रमांक लागला पाहिजे पण जी आर्थिक सुबत्ता चीनमध्ये आली ती खालच्या स्थरा पर्यंत पोहोचली नाही काही मोजकीच जनता श्रीमंत व अति श्रीमंत झाली पण सर्व साधारण जनता अजून गरीबच राहिली. राजकीय स्वतंत्रता ,एक मोठा वर्ग गरिबी रेषेखाली असल्यामुळे पुढील २० ते ३० वर्षे तरी हि दारिद्र्यखाई भरून येणे कठीण आहे. म्हणजेच आज जन्म घेतलेली मुलां
एकंदर जागतिक चित्र बघता आपल्या मुलां
सर्व भारतीयांना ह्यासाठी बरीच मे
जय हिंद.........
------------------------------ ------------------------------ -----------
संदर्भ ---वाशिंग्टन पोस्ट लेख " A surprising map of the best and worst countries to be born into today "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा