रविवार, १६ जून, २०१३

फादर्स डे ……….










आज १६ जुन आणि तथाकथित " फादर्स डे '" त्या निमित्याने बापाची व्यथा मांडण्याचा एक प्रयत्न.



फादर्स डे एक दिवस साजरा करून आपण इतिकर्तव्य पार पडले अशी सध्या आपल्या समाजात समजुत दृद्ध झाली. खरे तर वडिलांचे महत्व कोणास कळलेच नाही किवा त्याकडे डोळेझाक होते. वडील हे घराचा आधार पण जितके आईचे महत्व मुलाना असते तेवढ्ये वडिलाचे  असते का

समाजाच्या सगळ्याच थरांत आई विषयी गोडवे गाईले जातात पण वडिला विषयी अनास्था. कवी, संत ,महात्मे ह्यांनी सुद्धा आईचे थोरपण  व तिचे महत्व सांगितले पण बापा विषयी काहीही आज पर्यंत लिहिलेले आढळत नाही. सर्व चांगल्या गोष्टीना आईची उपमा देण्यात येते व बाप हा नेहमी वाईट वृतीचाच रेखाटण्यात लेखक मागे नसतात. जगात काही बाप तसेही असतील मग बाकीच्या बापाचे काय ?


वडिलांचे अस्तित्व संसारात असते त्याच बरोबर आई हि मांगल्य मयी, प्रेमळ अशी रेखाटली जाते पण ज्या वडिलामुळे हा संसाराचा गाडा उभा असतो त्याला कोणी समजुन घेऊन त्याचे अस्तित्व मानत नाहीत.


आई मुलाना जन्म देते म्हणजे त्यांत वडिलाच सहभाग असतो ना ? मग मुल जन्मल कि आईचे कौतुक ,तिने नऊ महिने सोसलेले कष्ट  व बाळंतपणात झालेला त्रास ह्याचेच होत असते पण दवाखान्यात अस्वस्थ ,चिंतेने ग्रासलेला बाप कोणास दिसतच नाही. जस जसे मुल मोठे होत जाते त्यासाठी ज्या काही खस्ता बाप खातो त्या पण दुर्लक्षित होतात. मुलासाठी सर्वकाही पुरवतो पण आपल्यासाठी काहीही न घेणारा बाप जरी त्याच्या चपला झिजलेल्या असतील तरी तो नव्या न घेता  आपल्या मुलांसाठी नवीन वस्तु घेवुन येतो.स्वतः जुने कपडे वापरतो पण मुलांसाठी नवीन कपडे घेतो,कैकवेळा संसारात तोंड मिळवणी करताना उपवास पण घडतो पण मुलांना उपवास घडु देत नाही.



वडील लहानपणा पासुन ते मुलाचे शिक्षण संपे पर्यंत सारखा झिजत असतो तरीपण कधी आपण केलेल्या कष्टाचे कोणी  कौतिक करावे असे मनात येत नाही कारण त्याचे समाधान मुलांच्या प्रगतीत असते. आई मुलांना माया ,ममता, प्रेम देते तर बाप त्यांना आपल्या पायावर जगात उभे राहण्यासाठी सतत मदत करीत असतो पण त्याची दक्खल कोणीच घेत नाहीत. मुलांना दुख: किवा आनंदी झालेले बघुन  आई जवळ घेते व सांत्वन,कौतुक करते म्हणून ती मुलाना जवळची वाटते . बाप त्यावेळी त्याला होणारे दुख: किवा आनंद व्यक्त करीत नाही म्हणून तो तितकासा जवळचा मुलांना वाटत नाही. बाप कधीही तोंडावर कौतुक करीत नाही पण जना मध्ये आपल्या मुलांचे तोड भरून कौतुक करतो तरी मुलांना वाटते आपला बाप रुक्ष आहे.



मुलांना जर ठेच लागली तर चटकन " आई ग " असे उद्गार बाहेर पडते आणि एखादे वेळी मोठे संकट उभे ठाकले की "  अरे बापरे "  ह्या वरून काय निदर्शनास येते की बाप नेहमी मोठ्या संकटाना सामोरे जातो व त्यातुन निर्विघ्नपणे बाहेर पडतो म्हणून त्याची आठवण येते अन्यथा या बापाची आठवण तशी विस्मृतीत असते.



जसे  प्रत्येक बाबतीत अपवाद असतो तसे इथे ही आहे बापाच्या मुली मात्र खऱ्या अर्थाने त्याना मुला पेक्षा जास्त समजून घेतात. ह्या माहेरवासीनि आपल्या वडिलांच्या आवाजात व चेहऱ्यात  झालेला बदल चटकन जाणतात व विषयांतर करून वडिलांना झालेल्या आठवणी पासुन दूर नेण्याचा प्रयत्न करतात. बहुतअंशी असे दिसते की मुलगी वडिलांना समजुन घेत आणि त्याना जपण्याचा प्रयत्न करते तशी बाकीच्यांनी तसेच वडिलांना जाणावेसमजून घ्यावे अशीच माफक इच्छा असते वडिलांची ना ही का ?


असे घडले तरच " फादर्स डे  ' एक दिवसाचा नुसता सोहळा नसुन मुलांसाठी वडिलानी दिलेले संस्कार, संगोपणासाठी  खालेल्या खस्ता ह्या सर्वांची जाण ठेवली तरच खऱ्या अर्थाने वडिलांचा मान सन्मान ठरेल.

   





=======================================================================
चित्रे गुगलच्या सौजन्याने . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: