सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

डॉ . अब्दुल कलाम यांनी दिनांक मार्च १२, २०१४ ला भारतीयांना लिहिलेले खुले पत्र………. !!



आपले सर्वांचे लाडके '" मिसाईल म्यान "' माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल  कलाम आपली इहलोकीची यात्रा संपवुन परलोकस्थ झाले . सर्व लहान थोर भारतीयाना वाईट वाटले . प्रत्येकांनी त्याना आपल्या परीने श्रद्धांजली वाहिली . एक वर्ष अगोदर त्यांनी भारतीयांना कळकळीचे पत्र लिहुन सर्वाना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन दिली . ह्या इंग्रजी पत्राचे आमचे मित्र शशी पानट ( अमेरिका ) ह्यांनी अनुवाद करून श्रद्धांजली वाहिली . 











आपल्याकडील मीडिया  इतक नकारार्थी कां  असते ? आपण भारतीय आपली शक्ती आणि कर्तुत्व ओळखण्यांत लाज कां बाळगतो ?खर तर आपला देश किती महान आहे .!
आपल्या लोकांना आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या कितीतरी यश-गाथा आहेत. पण त्या मनः पुर्वक स्वीकारायला नकार देतो कां ? 
दुध उत्पादनात आपण जगात पहिले आहोत , Remote  sensing satellites मध्ये आपण पहिला क्रमांक पटकावला आहे. गव्हाच्या उत्पादनात आपण जगात दुसर्या क्रमाकावर आहोत. तांदळाच्या उत्पादनात आपण पण जागतिक क्रमाक दुसरा आहे. 
आता डॉ . सुदर्शन सारख्या भारतीयांनी एका छोट्या खेडे गावाला स्वतःच्या पायावर उभे करून ,स्वावलंबी करून, त्यांचा कायापालट करून टाकला . या अश्या अनेक ,लाखो यशोगाथा आपल्याकडे असतांना आपला मिडिया मात्र वाईट बातम्या, अनर्थ , आरीष्ट , अपघात आणि दिवाळखोरीच्या बातम्यांनी ग्रासला गेला आहे.

काही दिवसापूर्वी मी तेल-अव्हिव मध्ये होतो आणि तिथे असताना एक वर्तमानपत्र वाचीत होतो. त्याच्या आदल्याच दिवशी बॉम्बिंग सारखा मोठा  अनर्थ घडून गेला व बरीच मनुष्यहानी झाली होती . हमासचे  युद्ध चालू होते. असे असतानाही वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मात्र तिथल्या एका सद्गृहस्थाने आपल्या नापीक वाळवंटासारख्या शेतीवर कामं करून गेल्या पांच वर्षात कसे हिरवेगार नंदनवन केले ह्याचे समग्र वर्णन आणि फोटो छापले होते. ह्या उतेजानात्मक बातमीच्या वाचनाने त्या शहराला जाग आली होती . अर्थात आदल्या दिवशीच्या बॉम्बिंग आणि युद्धाच्या बातम्या ,किती माणसे पडली आहेत, वगैरे सरा मजकूर वर्तमानपत्राच्या आंतल्या पानावर इतर बातम्याच्या आड दडलेला  होता . 
भारतांत आपण आजारपण,मरण, एकमेकावर झालेले हल्ले , गुन्हे, ह्याच बातम्या पुरवीत असतो ,वाचत असतो.आपण इतके नकारार्थी कां वागतो ?दुसरा प्रश्न ,आपण सारे भारतीय परदेशाच्या इतक्या आकर्षणात कसे काय गुरफटत आहोत. ? 
आपल्याला परदेशी टिव्ही पाहिजे, सदरे पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे, हे इथर देशामधून आयातीच्या कल्पनेने आपले मन असे व्यापुन  का जाते ? एवढे आकर्षण का ?
तुम्हाला कल्पना नाही का कि स्वतःबद्दलचा मान सन्मान हा स्वतःला ओळखल्यानेच प्राप्त होतो. 
मी हैदराबादला एका भाषणासाठी गेलो होतो. त्याठिकाणी एका चौदा वर्षाच्या लहान मुलीने माझी स्वाक्षरी मागितली . मी तिला विचारले " तुझ्या आयुष्याचे ध्येय काय ( बेटा ) "? तिने तात्काळ उत्तर दिले " मला सुधारलेल्या भारतात राहायचे आहे " 
तुम्हाला आणि मला तिच्यासाठी आपल्या भारतांत सुधारणा करायच्या आहेत. 
तुम्ही जाहीरपणे सांगायला पाहिजे, घोषणा द्यायला पाहिजेत, " भारत हा सुधारणेच्या मार्गावरचा देश नाही, तर खूप सुधारलेला देश आहे. "
तुम्ही म्हणता  की आपले सरकार कार्यक्षम नाही 
तुम्ही म्हणता की आपले कायदे फार जुने झालेत . 
तुम्ही म्हणता की मुनिसिपालटी  कचरा साफ करीत नाही .
तुम्ही म्हणता की फोन चालत नाही, रेल्वे एक जोकच आहे, आपली एअर लाईन ही  जगांतील घाणेरडी एअर लाईन आहे , पोस्टांत टाकलेले पत्र ठिकाणावर कधीच पोहोचत नाही . 
तुम्ही म्हणता आपला देश कुत्र्याचे जीणे जगतो आहे आणि सर्व  देश म्हणजे एक गोठा झाला आहे . 
तुम्ही म्हणता , म्हणत राहता ……. 
अरे पण ह्या सगळ्यासाठी तुम्ही काय करतां  ?

सिंगापूरला जाणारे तुम्ही आहात अशी कल्पना करा . तुमचे नाव त्या व्यक्तीला द्या , तुमचा चेहरा त्या व्यक्तीचा असेल ,मग तुम्ही सिंगापूरला पोहोचून विमानतळाच्या बाहेत येतां , आणि काय आश्चर्य तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय वागणुकीचा मुखवटा पटकन चढवता. 
सिंगापूरला तुम्ही सिगारेचे थोटूक रस्त्यावर फेकीत नाही , किवा स्टोरमध्ये काहीतरी खात उभे राहत नाही. सिंगापूरच्या नागरिकाना जेव्हढा अभिमान तिथल्या रेल्वेचा वाटतो तेव्हढा ( किंबहु अधिकच ) तुम्हाला वाटतो . 
तिथल्या सुप्रसिद्ध ओचार्ड रोडवर संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान प्रवास करण्यासाठी तुम्ही ५ डॉलरचे तिकीट सहज घेता . मग तुम्ही पार्किंग लॉट मध्ये येवुन तुमचे तिकीट पंच करतां .तिथल्या दुकानांत  किवा रेस्टारंटमधे  अधिक वेळ घालविला तर वर लागणारे पार्किंगचे पैसे मुकाट्याने भारतां . तुम्ही तिथे कांही तक्रार करता,नाही ना ?
रमादान चालु असताना दुबई सारख्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांसमोर 

( भर रस्त्यात ) काही खाता  कां ? नाही नां ?

जेड्डाच्या रस्त्यावर तुमच्या डोक्यावर वस्त्र ( रुमाल बांधलेला ) नाही अश्या स्थितीत जातां का तुम्ही ? नाही ना ?
लंडनमध्ये " माझे ISD  किवा STD चे बिल दुसर्याच्या अकौंट मध्ये जाऊदे त्यासाठी हे घे महिन्याला १० पौंड " अशी लाच तुम्ही देऊ शकता का ? देतां कां ? नाही ना ?
वाशिंग्टनमघे  स्पीडलिमिटच्यावर गेलात आणि पोलिसाने पकडले तर " तुला माहित आहे मी कोण आहे ते ? मी अमक्या तमक्याचा मुलगा आहे. चल घे हे १० डॉलर्स अन जाऊदे मला  " असे म्हणण्याची प्राज्ञा आहे कां ?
ओस्ट्रेलिया अथवा न्युझिलंड मध्ये नारळ फोडला तर कचरा पेटीत न टाकता भलतीकडेच टाकण्याचे धर्य तुम्ही दाखवु शकाल का ? नाही नां ?
टोकियोच्या रस्त्यावर पान खाऊन तुम्ही कां थुंकत नाही ? किवां  बॉस्टन रस्त्यावर तुम्ही खोटे सर्टीफिकेट कां  खरेदी करीत नाहीत ? 
होय आपण अजुनही तुमच्या बद्दल बोलतो आहोत …। 
हो तुम्हीच जे परदेशाच्या नियमांचे पालन स्वेच्छेने करता पण स्वदेशाचे नियम मात्र पायदळी तुडविता . 
भारताच्या विमानतळावर ऊतरता न ऊतरता तोच तुम्ही, हो तुम्हीच सिगारेटचे थोटूक , कागदाचे कापटे , हे वाट्टेल तीथे फेकतां परदेशाच्या भूमीवर त्यांचे नियम पाळणारे, तिथे कायद्याच्या चौकटीत चालणारे, त्यांच्या स्वछेतेचे कौतुक करणारे, तुम्ही आपल्या मायदेशाच्या भुमीला पाय लागताच कां बदलतां एवढे ? तुम्ही तसे कां  वागत नाही ईथे?
अमेरिकेत प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला कुत्र्याने केलेली घाण स्वतःलाच आवरावी लागते, जपान मघ्ये ही तेच , भारतीय नागरिक तसे करतील कां इथे ? 
आपण फक्त निवडणुकीच्या वेळी सरकार निवडण्यासाठी पुढे सरसावतो आणि नंतर आपली जवाबदारी झटकून मोकळे होतो. त्यानंतर मात्र आपण सरकार आपली सर्व प्रकारे सेवा करेल अश्या भ्रमांत राहतो , आराम करतो . त्यांना कोणतीही मदत तर सोडाच पण सारखा नकारार्थी हातभार मात्र नित्य नियमाने सतत आपण  लावितच असतो . 
सरकारने सर्व माफ करावे अशी अपेक्षा आपण ठेवतो ,मात्र सारीकडे पसरलेल्या कचऱ्यातला थोडा भागही उचलण्यासाठी अथवा साफ करण्यासाठी थांबायला आपल्याकडे वेळ नसतो .कारण तुमच्या मते ते काम दुसऱ्या कुणाचे असते , तुमचे नव्हे ! किंबहुना कागदाचा एखादा कपटाही  उचलुन कचऱ्याच्या पेटीत टाकावा असे आपल्या मनात देखील येत नाही . रेल्वेमधील संडास त्यांनी नेहमी स्वच्छ ठेवावे ह्या अपेक्षेबरोबरच तो साफ ठेवण्याचे उत्तरदायित्व आपलेही आहे हे आपल्याला कधीच आठवत नाही . 
भारतीय विमानसेवा अर्थात एअर इंडीया आणि खाजगी विमानसेवा कंपन्यांनी चांगली उत्तम जेवण द्यावे , उत्तम टॉयलेटची व्यवस्था करावी अश्या अप्र्क्षा आपण ठेवतो मात्र  जमले तर  एखादी भुरटी चोरी देखील करायला आपण मागेपुढे  नाही . दुर्दव्याने  हा नियम अशा प्रकारची उत्तम सेवा न देणाऱ्या त्यांच्या नौकर वर्गालाही लागू आहे. 
समाजात असलेल्या अत्यंत ज्वलंत प्रश्नांना ,मग ते स्त्रियांविषयी असोत  ,हुंड्याच्या बाबतीत असो   मुलगी झाली म्हणून असो आपण मोठ मोठ्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करतो पण तेच आपण घरी गेल्यावर मात्र मुग गीळून स्वस्थ बसतो . तिथे तुम्ही नेमके विरुद्ध वागता . 
काय आहे आपले समर्थन ? कोणती करणे आहेत अशी की ज्यामुळे आपण असे वागतो ?
" अरे हा बद्दल होण्यासाठी संपूर्ण सिस्टमच बदलायला पाहिजे . मी एकट्याने बदलुन  काय मोठासा फरक पडणार आहे ? "
मग कोण बदलणार हि सिस्टम ?आणि असत तरी काय ह्या सिस्टममध्ये ?
ह्यामध्ये असतात आपले शेजारी, घरातली ईतर माणसे,इतर शहरे आणि गावे , इतर समाज आणि हो, सरकार देखील ,फक्त त्यामध्ये "मी " आणि " तुम्ही " नसता . हो ना ?
जेव्हा सकारात्मक असा कोणताही बदल घडविण्यासाठी ह्या सिस्टीम मध्ये   योगदान दयायचे असते तेव्हा आपण सार्वजण आपल्या कुटुंबासहित स्वतःला एका कोषांत बंद करून घेतो आणि दूरवर असलेल्या देशांकडे असाहयतेने  पाहत असतो , कोणी तरी मिस्टर क्लीनयेईल ,आणि अशीकाही जादूची कांडी फिरवेल की त्याच्या एका फटकाऱ्याने सारे  काही व्यवस्थित होईल अशा भ्रमात राहतो . तेही जमले नाही तर आम्ही आमचा देशच सोडतो ,आणि एखाद्या भयभित  षंढासारखे पळत सुटतो ,अमेरिकेसारख्या देशांत जातो त्यांच्या ऐश्वर्याची ,त्यांच्या सिस्टमची पोटभरून स्तुती करतो आणि त्यांच्या ऐश्वर्याच्या वाढीसाठी कष्ट करीत राहतो ,आणि न्युयार्काला काही अघटीत घडले की आम्ही इंग्लंड पोहोचतो, इंग्लंडला काम मिळाले नाही तर विमानाने गल्फला जातो, गल्फच्या  अडकलो तर आम्ही भारत सरकारने आम्हाला सोडविले पाहिजे ही मागणी कंठशोष करून आणि सर्व जगाला ऐकु जाईल एवढ्याने  बोंबलतो !!
सगळेचजण नाजायत  फायदा घ्यायला टपलेले आहेत आणि भारतावर बलात्कार करताहेत. सिस्टिमसाठी वा ती चांगली होण्यासाठी कुणीही योगदान करीत नाही , आपली सद्दविवेक बुद्धी आपण पैशाकडे गहाण टाकली आहे . 
प्रिय भारतीयांनो  हे पत्र मी मुद्दामच लिहिले आहे ,ह्यामधून विचारप्रवर्तक असे आत्मनिरीक्षण व्हावे आणि आपल्या सद्द्विवेक बुद्धीला आव्हान दयावे हाच उद्देश आहे. 
शेवटी मी जे, एफ, केनेडी ह्यांनी अमेरिकन नागरिकाना दिलेला संदेश जसा होता तसेच आवाहन आपणां सर्वाना करतो …. 
"  आपण भारतासाठी काय करू शकु , काय करायला पाहिजे ह्याचा विचार करा ,कि जेणे करून  आपला भारत आज अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश आहेत तसा घडु शकेल  "
भारताला आपल्याकडुन काय हवे ते आपण करु या !!!
धन्यवाद 
आपला ,
डॉक्टर अब्दुल कलाम 




------------------------------------------------------------------------------

 अनुवादक ----शशिकांत पानट 

छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .

 




 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: