रोजच्या आपल्या जिवनात आपण बऱ्याच कंपन्याचे लोगो बघत असतो पण त्यामागे दडलेला अर्थ दुर्लक्षित करतो किंवा तसा विचार पण करीत नाही ,ना तसा शोध घेतो . अश्याच काही कंपन्याच्या लोगोत दडलेला अर्थ बघु या .
१) बस्किन रोब्बिन्स ( Baskin Robbins )
" BR " हा लोगो . ह्या लोगो मध्ये ३ व १ अंक पिंक रंगात ठळक दिसतात ह्याचा अर्थ " आम्ही ३१ निरनिराळ्या स्वादाचे आईस्क्रीम गिऱ्हाईकांना पुरवितो '' असे ह्या आईस्क्रीम चेनचे ब्रीद वाक्य आहे .
२) फेड एक्स ( FedEx )
हा लोगो निट बघितले असता आपणास एक बाण Ex ह्या शब्द्दामध्ये दिसेल .ह्याचा अर्थ असा कि " आम्ही सदैव पुढे जातो ' किवा " सदैव गतिमान आहोत "
३) गुगल ( Google )
जर का हा लोगो निट बघितला तर आपणास दिसेल कि लेटर " l " हा हिरव्या रंगाचा आहे. असे दिसते की प्राथमिक इतर रंगामध्ये असलेल्या अक्षरांत हिरवे अक्षर जणु काही बंडाचे निशाणाप्रत आहे. हेच गुगल कंपनीला लोकांसमोर दाखवायचे आहे कि " आम्ही इतरां पेक्षा वेगळे आहोत "
४) अमेझॉन ( Amazon )

ह्या लोगो मध्ये आपणास दिसेल कि A आणि Z ह्या अक्षरांना पिवळसर बाणांनी अधोरेखित केलेले आहे. ह्याचा अर्थ असा की
" आपणास जे हवे आहे ते आम्ही A पासून Z पर्यंत सर्व काही पुरवु
तेही हसत मुखाने '"
" आपणास जे हवे आहे ते आम्ही A पासून Z पर्यंत सर्व काही पुरवु
तेही हसत मुखाने '"
५) सिस्को ( Cisco )
स्यान फ्रान्सिस्को या शहरांत स्थित असलेली ही कंपनी आपल्या
लोगो मध्ये कंपनीच्या नावावरती निळ्या रंगाचे लहान मोठे पट्टे दाखविले आहेत .
हे पट्टे म्हणजे एक प्रकारची आदरांजली आहे तीथे असलेल्या प्रसिद्ध " गोल्डन गेट " साठी .
लोगो मध्ये कंपनीच्या नावावरती निळ्या रंगाचे लहान मोठे पट्टे दाखविले आहेत .
हे पट्टे म्हणजे एक प्रकारची आदरांजली आहे तीथे असलेल्या प्रसिद्ध " गोल्डन गेट " साठी .
६) एल जी ( LG )
दक्षिण कोरियन कंपनी आपल्या लोगोत L आणि G ह्या दोन अक्षरांचा उपयोग एकत्रित करून एक हसरा चेहरा बनविला ज्याद्वारे कंपनी आपल्या गिऱ्हाईकाना अस्वस्थ करत आहेत की आम्ही आपणास नेहमी खुश ठेऊ .
७) विकिपीडिया (Wikipedia )
ह्या लोगोत अर्धे जग दाखविले आहे जे कोड्याच्या तुकड्यांनी बनलेले आहे . जे दाखवितात कि किती अवघड व अनंत आहे संपूर्ण जगातील माहिती सामग्री जमा करणे आणि साठवणे .
८) सोनी वायो ( Sony Vaio )
सोनी कंपनीने अतिशय कल्पकतेने Vaio लोगोत एनालॉग ( Analog ) आणि डिजिटल ( Digital ) आकृतिबंध लहरीचा उपयोग केला .
9) अदीदास ( Adidas )
ही कंपनी मैदानी खेळासाठी पोषाख बनवणारी जगभरात नामांकित आहे. ह्याच्या लोगोमध्ये तीन आडव्या पट्ट्या अशारीतीने दर्शविल्या की ज्या उंच डोंगरा सारखा दिसतील . ह्या तीन पट्ट्याचा डोंगर खेळाडूना स्पुरण देतो की जरी तुमच्या पुढे बऱ्याच अडचणी ,अडथळे असतील यश संपादन करण्यासाठी पण आमच्या साथीने तो तुम्ही मिळवाल .
१०) फार्मुला वन ( Formula १ )
ह्या लोगोकडे निरखून बघितले कि आपणास असे दिसेल F शब्द्द आणि लाल रंगाच्या पट्ट्या यामध्ये पांढऱ्या रंगात १ आकडा दिसतो .
११) कोका कोला ( Coca -cola )
ह्यांच्या लोगो मध्ये जर निरखून पहिले तर cola ह्या शब्द्दात " O " ह्यांत ड्यानिश ( Danish ) झेंडा छुपलेला दिसेल.
१२) म्याकडोनाल्ड ( MacDonald )
१९६० साली जेव्हा ह्या फास्ट फुड कंपनीस नवीन लोगो बनवावायाचा होता तेव्हा त्यांनी Louis Cheskin मानसशास्त्रज्ञ ह्यांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी नावातला " M " हा शब्द्द गोल्डन आर्च बनविण्यास सांगितले कारण ते स्त्रीच्या उरोजा सारखे दिसते आणि त्यातून संगोपनाचा संदेश दिला जाईल .
=============================================
माहिती संकलन मायाजाला वरून आणि छायाचित्रे गुगलच्या सौजन्यने……।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा