सोमवार, १४ एप्रिल, २०१४

कौटिल्य अर्थशास्त्र---


कौटिल्य अर्थशास्त्र----

 सरकारी पैशाचा गबन करणे हा शाशकीय कर्मचार्याचा स्थायी स्वभाव आहे.



कौटिल्य हे गुप्त काळातील ऐतिहासिक पुरुष चाणक्य होत .ह्यांचे मुळ नाव  विष्णुदत्त होते पण ते चाणक ह्याचे पुत्र म्हणून त्याना चाणक्य असे संबोधित असत. चाणक्य हे कुटील राजनीतिक असल्यामुळे त्यांना कुतीली म्हणून त्या काळी संबोधिण्यात येत असे. " कुटील " ज्याचा अर्थ आपण सर्वाना आहे तसा इथे नाही कारण चाणाक्यची राजनीती त्या अर्थाने कुटील नव्हती तर जी आपण सध्याच्या राजकाराण्यामध्ये बघतो .आपल्या वयक्तिक लाभासाठी केलेले राजकारण त्या अर्थाने कुटील होय ,पण चाणक्यांनी ती कधीच केली नाही . त्यांनी चातुर्यपूर्ण राजनीती समाज व राष्ट्र्हितांत वापरून नाव नवीन प्रयोग केले आणि ह्यासच सामान्य जनतेच्या दृष्टीने  कुटिलता होती.


कौटिल्य अर्थ शाश्त्रांत त्यांनी राजकारभार कसा करावा व राजाने जन हितासाठी काय कराव व काय करू नये ह्याचे वर्णन केले आहे. त्याकाळी राज्य व्यवस्था राजे महाराजे केंद्रित होती पण आजची परिस्थिती भिन्न आहे . कौटिल्य अर्थ शाश्त्रातील बर्याच गोष्टी आजच्या युगात अर्थहीन असतील पण काही गोष्टी अर्थपूर्ण आहेत व महत्वाची बोध घेण्यासारखी आहेत. जसे चाणक्य नीतीत काही वचनांचा उलेख स्पष्ट आढळतो ज्यांत कसे शाशकीय धन जे समाज कार्यासाठी राखीव असते त्याचे शाशकीय कर्मचारी व राज्यकर्ते संगनमताने  कश्या प्रकारे तो पैसा  हडप करतात पण सामन्यास त्याचा थांग पत्ता पण लागत नाही . ह्या संबंधात चाणक्य नीतीतील  हे दोन श्लोक व त्याचा अर्थ समजून घ्या .


   यथा ह्यनास्वादयितुं न शक्यं जिह्वातलस्थं मधु वा विषं वा ।
अर्थस्तथा ह्यर्थचरेण राज्ञः स्वल्पोऽप्यनास्वादयितुं न शक्यः ॥

(कौटिलीय अर्थशास्त्र, प्रकरण 25 – उपयुक्तपरीक्षा)


अर्थ--- ज्या प्रकारे जेभेवर ठेवलेला स्वादिष्ट किवा विषारी पदार्थाची  चव न घेणे असंभव आहे त्याच प्रकारे सरकारी धन जो  जनकार्यासाठी  राखलेला असतो तो नियुक्त कर्मचारी काही अंश तरी गबन केल्याशिवाय राहू शकत नाही.


तात्पर्य काय तर जेव्हा एखादे विहित जनहित कार्यावर एखाद्या कर्मचार्याची नियुक्ती होते व त्या कार्यासाठी सरकारी तिजोरीतून राखली जाते तेव्हा त्यास तो लुटण्याचा मोह होतोच आणि भरीस भर जर शासनकर्ते जेव्हा त्यांत सामील होतात तेव्हा घोटाळा झालाच समजा. हि प्रवृत्ती सदाच माणसामध्ये असते. जसे विहित खर्चा  पेक्षा आधीक  खर्च दाखविणे , मर्जीतील  ठेकेदारांना अनेक क्लुप्त्या करून ठेका देणे, इत्यादी . दुर्भाग्याची बाब म्हणजे आज काल सर्व योजना कागदावरच बनतात व पूर्ण पण होतात व पैसा खर्च पण झालेला  असतो पण कार्य अस्तित्वातच नसतो. लोक इतके निर्लज्य झालेत कि पैसा खावून वर आम्ही नाही त्यातले म्हणण्यास  कमी नाही पडत. गेल्या दहा वर्षातील घोटाळे प्रकरणे आपम सर्वांनी बघितले आहेच ना.


मत्स्या यथान्तःसलिले चरन्तो ज्ञातुं न शक्याः सलिलं पिबन्तः ।
युक्तास्तथा कार्यविधौ नियुक्ता ज्ञातुं न शक्या धनमाददानाः ॥
(यथा पूर्वोक्त)


अर्थ--- ज्या प्रमाणे तळ्याती मासे केव्हा पाणी पीत आहेत आणि केव्हा बक हे जसे समजणे कठीण आहे तसेच हि राजकीय मंडळी आणि शाशकीय कर्मचारी मिळून केव्हा पैसा हडप करीत आहेत हे समजणे कठीण आहे.


सरकारी पैसा जो जनहित कार्यासाठी असतो तो  कर्मचार्यांच्या हातात असतो तो ते केव्हा खर्च करतील सांगत येत नाही . अश्या खर्चावर नियंत्रण ठेवणारी संस्थ असते पण ते प्रत्येक  पावलावर नियंत्रण ठेवू शकत नाही . तेव्हा त्याच्या विश्वासावर सर्व कामे दिली जातात म्हणून अशी माणसे घोटाळे करतात . जेव्हा घोटाळा उघड्कीय येतो तेव्हा कर्मचारी आणि शासनकर्ते एकमेकावर आरोप करतात आणि ती बाब कशी बासनात गुंडाळून ठेवतात हे आपण सर्वांनी बघितले आणि अनुभवले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

 सौजन्य----योगेन्द जोशी ( विचार संकलन )  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: