गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

सुभाषचंद्र बोस : परिचय







 श्री जानकीनाथ व श्रीमती. प्रभावती ह्यांचे पुत्र   नेताजी सुभाषचंद्र बोसचा जन्म २३ जानेवारी १८९७ साली झाला . 








१९१३ साली त्यांनी आपले कॉलेज शिक्षणास सुरवात केली आणि प्रेसिडेंसी कॉलेज कलकत्ता इथे प्रवेश घेतला 

१९१५ साली त्यांनी  इंटरमीडिएटची  परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. 

१९१६ साली एका ब्रिटीश प्रोफेसर बरोबर दुर्व्यवहार केल्याच्या आरोपावरून निलंबित केले गेले. 

१९१७ साली स्‍कॉटिश चर्च कॉलेज में फिलॉसफी ऑनर्स मध्ये प्रवेश घेतला. 

१९१९ साली  ऑनर्स मध्ये  प्रथम स्‍थान प्राप्त करून ते आईसीएस परीक्षा देण्यास इंग्लंडला रवाना झाले. 

१९२० साली  सुभाषचंद्र बोस यांनी  आईसीएस  परीक्षा सबंध ब्रिटीश साम्राज्यात अधिक मार्क घेवून चौथा क्रमांक पटकावला. 

१९२० साली त्यांनी  कैंब्रिज विश्‍वविद्यालयाची  प्रतिष्‍ठित डिग्री प्राप्‍त केली. 

१९२१ साली त्यांना  गिरफ्तार करण्यात आले आणि १९२२ साली त्यांची जेल मधून सुटका झाली त्या नंतर देशबंधु चितरंजनदास ह्यांच्या अध्याक्षितेखाली बोलाविलेल्या  काँग्रेस अधिवेशनात  स्‍वराज दलांत प्रवेश केला. 

१९२३ साली त्यांना भारतीय युवक काँग्रेसचे  अध्‍यक्ष निवडण्यात आले. ह्याच बरोबर बंगाल कॉंग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती झाली . ह्याच वर्षी ‘फॉरवर्ड’ पत्रिकेचे संपादन करण्यास सुरुवात केली. 

१९२४ साली स्‍वराज दलास कलकत्ता मुनिसिपल निवडणुकीत सफलता मिळाली आणि  देशबंधु मेयर बनले .शरद बाबूंना मुख्‍य कार्यकारी अधिकारी मनोमित करण्यात आले.सुभाष बोस याचा वाढता प्रभाव ब्रिटीश सरकारला रुचला नाही आणि परत त्यांना तुरुंगात पाठवले  

१९२५ साली देशबंधुचे निधन झाले . 

१९२७ साली नेताजी जवाहरलाल नेहरू समवेत अखिल भारतीय कॉंग्रेस  कमेटीचे साधारण सचिव निवडले गेले. 

१९२८ साली स्वतंत्रता आंदोलन अधिक धारदार बनविण्यासाठी त्यांनी भारतीय कॉंग्रेस  कलकत्ता अधिवेशाना दरम्यान एक संघटना गठीत केली  "स्‍वैच्‍छिक संगठन " आणि त्याचे ते  जनरल ऑफिसर इन कमांड म्हणून निवडून आले. 

१९३० साली परत त्यांना  अटक करून जेल मध्ये डांबण्यात आले. जेल मधूनच त्यांनी कलकत्ताच्या मेयरची  निवडणूक जिंकली 

१९३१ साली क्रांतिकारी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली ह्याच  कारणावरून महात्मा गांधी आणि नेताजी मध्ये मतभेद निर्माण झाले 

१९३२ ते १९३६ ह्या काळात नेताजींनी भारताच्या आझादीसाठी विदेशी नेत्याकडून पाठींबा मिळविण्यासाठी इटलीत मुसोलनी ,जर्मनीत फेल्डर ,आयर्लंडचे  वालेरा,फ्रांसचे रोम रोनांड ,देशांचा दौरा केला . 

१९३६ साली भारतात परत आल्यावर मुंबईला अटक करवून घेतली . 

१९३६ ते १९३७ साली जेलमधून मुक्त झाल्यावर त्यांनी युरोप मधून  ‘इंडियन स्‍ट्रगल’ प्रकाशित करण्यास सुरवात केली 

१९३८ साली हरिपूर अधिवेशनात कॉंग्रेसचे अध्यक्ष निर्वाचित झाले . ह्याच काळांत  शांति निकेतन इथे श्री रवींद्रनाथ टैगोर यांनी त्यांचा सन्मान केला . 

१९३९ साली महात्‍मा गाँधीचे उमेदवार सीतारमैया यांचा पराभव करून पुन्हा एकदा कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले . नंतर फॉरवर्ड ब्‍लॉकची स्थापना केली 

१९४० साली त्यांना नजरबंद कैदेत ठेवण्यात आले व अति उपवासामुळे त्यांची प्रकृती खालावत गेलि. 

१९४१ साली एका रहस्मय नाटकीय घटनाक्रमात ते भूमिगत झाले आणि  अफगानिस्‍तान ,रूस मार्गे जर्मनी पोहचले. 

१९४१ साली ९  एप्रिल रोजी नेताजींनी जर्मन सरकारला एक  मेमोरेंडम  दिले त्यांत  एक्‍सिस पॉवर आणि भारता बरोबर सहकार्य व मैत्री  संदर्भित  केली होती . ह्याच वर्षी सुभाषचंद्र बोसनी स्‍वतंत्र भारत केंद्र आणि  स्‍वतंत्र भारत रेडियोची स्थापना केली . 

१९४३ साली नौसेनाच्या मदतीने जपानला पोहचले आणि  टोक्‍यो रेडियो द्वारे भारतीयांशी संबंध साधला . २१ आक्टोंबर १९४३  रोजी आजाद हिन्‍द सरकारची स्थापना अंदमान आणि निकोबार इथे  केली  

१९४४ साली आजाद हिन्‍द फौज अराकानला  पोहचली आणि इंफाळ इथे युद्ध छेडले आणि कोहिमा आपल्या कब्जा मिलविला 

१९४५ साली दुसर्या विश्व युद्धात  परमाणु  बॉम्बच्या  माऱ्यापुढे जपानने  आपली हार मानली . त्याच्या काही दिवसा नंतर नेताजींची हवाई   प्रवासात  मरण पावल्याची बातमी आली पण प्रत्यक्ष कोणताही पुरावा मिळाला नाही . 


( संकलित )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: