लोकशक्ती ...जनशक्ती........विजय.......!!!!!!!!!
आण्णाचा विजय.......लोकशाहीचा विजय......!!!!!
अखेर अहिंसाच्या मार्गाने आण्णांनी भ्रष्टाचारा विरुद्धची पहिली लढाई जिंकली. ४५ वर्षानंतर लोकपाल विधेयकावर संसदेत एकमत झाले ही एक ऐतिहासिक घटना होय. भारत सरकारमधील काहीं नेते प्रथम पासूनच अन्नाचे आंदोलन कसे मोडून काढतायेईल इकडे जास्त लक्ष केंद्रित केले पण त्याना त्यांच्या अपेक्षे पेक्षा जास्त जनमत उभा राहिलं ही अपेक्षा त्यांना नव्हती. त्यांनी आपल्या कडील सर्व अस्त्रांचा उपयोग करून पहिला पण सरते शेवटी जन रेट्या पुढे झुकावेच लागले.
आज जें संसदेत सर्वांनि आण्णाच्या तीन मुद्यावर सहमती घडवून आणली ते काहीं महिन्या पूर्वीच करू शकले असते पण नाही, काही सरकार मधली मंडळी यास प्रत्येक वेळी खो देण्यामध्ये यशस्वी होत होते व आण्णा टीमचे सदस्य ताठर भूमिका घेत राहिले तेंव्हा वाटले कि हा तिढा कसा सुटणार ?
ज्या मंडळीना या आंदोलनाची तसेंच आण्णाच्या प्रकृतीती चिंता होती तसेंच श्री रविशंकर ,श्री भायू महाराज आणि ईतर बुद्धीजीवी लोकांच्या मध्यस्तीने सरते शेवटी संसदेमध्ये सार्वमत ठराव पास झाला तो मुखत्वे करून आण्णाच्या तीन मागण्या.
१ ) कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्यांना लोकपालाच्या कक्षेत आणा.
२ ) केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताची नियुक्ती करा ३ ) नागरिकांची सनद
समाजसुधारक माननीय अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाचे रणशिंग फुंकून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अतूट निर्धाराने पुकारलेल्या लढ्याला देशाच्या सर्व भागांतील आणि सर्व समाज घटकांतील युवकांचा मनःपूर्वक सक्रीय पाठिंबा मिळाला आहे, या युवा शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करून व चांगल्या दिशेकडे वळविले पाहिजे.
दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या आंदोलनामुळे मध्यम वर्गीय मतदार जागरूक झाला व ह्या आंदोलनात सहभागी झाला होता. आता वेळ आली आहे कि या जागरूक झालेल्या तरुण आणि मध्यम वर्गीय मतदारांनी येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील आणि आजतागायातचा निष्क्रियपणा बाजूला सारून आपल्या मतदानाचा हक्क बजावतील तरच योग्य प्रतिनिधी निवडले जातील.
संसदेने लोकपाल विधेयक पारित करून त्याचे रूपांतर कायद्यात करणे हा भ्रष्टाचार निर्मूलनाचा एक उपाय झाला. पण जो पर्यंत जनते मध्ये जनजागृती होणार नाही कि लाच घेणारा जसा दोषी तसाच लाच देणारा हि असतो.
म्हणून सर्वांनी प्रतीज्ञा करावी कि " मी लाच घेणार नाही आणि देणार नाही", आत्मीयतेचा भाव जागविला, तरच प्रचंड मानसिक परिवर्तन करणे शक्य होईल आणि त्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राला आपल्या विचारशैलीत बदल कारावा लागेल.
आण्णाच्या शब्दात लढाई अर्धी जिंकली ऊरलेल्या लढाईच्या तयारीत राहावे.
-------------------------------------------------------------------------------------------
अर्क चित्र (सुपर आण्णा ) जगदीश भावसार यांच्या सौज्यान्याने तसेच गुगल इमेजेस.
वाचकांची प्रतिक्रिया :--
dattatray jadhav Says:
8/29/2011 10:28 PM
संसद पवित्र आहे पण तिचे पावित्र्य टिकवायचे त्यांनीच तिला आपल्या
वागण्याने अपवित्र केले आहे .त्याची शिक्षा कोणी भोगायची. किरण बेदी व ओम पुरींच्या
वक्तव्यावर लगेच हक्क भंग प्रस्ताव आणता येत असेल तर त्यावर सर्वांचे एक मत होत असेल
तर जनालोकापाल्बिलावर निर्णय घ्यायला उशीर का लागतो तेथेही असाच झटपट निर्णय का घेता
येत नाही आपले मत व्यक्त करण्याचा हक्क सर्व भारतीयांना घटनेने दिला आहे हे लोकसभेतील
आपल्या खासदारांना नक्की माहित नाही ना?
संसद पवित्र आहे असे खासदार बोलत असतील तर अधिवेशनात गोंधळ आणि
सभात्याग करतात तेव्हा हे पावित्र्य गायब कसे होते. संसदेचा जितका बहुमूल्य वेळ हे लोक
वाया घालवितात तितके यांचे भत्ते कापले पाहिजेत. सतत गैरहजर असणार्या खासदारांची यादी
सार्वजनिक करणे आवश्यक आहे तेव्हा मतदारांना कळेल कि आपला खासदार काय करतो आणि
पुन्हा त्याला मत द्यायचे कि नाही हे थातावू शकेल.
shashikant gokhale Says:
| Delete
8/29/2011 12:46 PM
आपला ब्लॉग पाहिला.चांगला आहे. सध्या अन्ना टीमची ताठर भूमिका,
उर्मतपणा याविषयी रान पेटवले जाते त्याला अर्थ नाही. महाराष्ट्रात अडगळीत पडलेला अण्णा
हा हिरां शोधून त्याच्यामागे सर्व शक्तीनिशी उभी राहिलेली हि टीम.! महाराष्ट्राला न सुचलेले,
अण्णांना राष्ट्रीय थरावरील नेते बनविण्याचे फार मोठे काम अण्णांच्या या टीमने केले आहे.
त्यांना सौम्य शब्दात खाच खळगे समजावून देणे ठीक! पण अशां भाषेत त्यांच्या कामाला कमी
लेखणे कृतघ्नपणाचे होय!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा