श्रीगणेश चतुर्थी ( भाद्रपद शुद्ध चतुर्थी )
शके १९३३ ,१ सेप्टेम्बर २०११.





.

 श्री गणपती हे महाराष्ट्रचे आराध्य   दैवत आहे.सम्पूर्ण भारतात अपितु  जगात याची  मनोभावे  पुजा केली जाते.   सर्व कार्याच्या प्रारंभी गणपती पूजन केले जाते. त्याचे मुख्य रूप ॐकार हे आहे. तो विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, बुध्दिदाता आहे   अशा या गणेशाचे पूजन अथर्वशीर्ष या मंत्र घोषाने त्या गाजाननाची आराधना करतात. हे मंत्र अथर्वण ऋषींनी रचलेले आहे. या  अथर्वशीर्षाचा  अर्थ असा की अथर्व म्हणजे न थरथरणारा आणि शीर्ष म्हणजे डोके. याच्या पठणाने बुध्दी स्थिर राहते, 




ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूर्भिर्व्यशेम देवहितं (देवहितैं) यदायु: ||१||
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||
ॐ तन्मा अवतु। तद् वक्तारमवतु। अवतु माम्। अवतु वक्तारम् ॐ शांति : शांतिः शांति : ..........ll3ll


 अर्थ : हे देवतानो, कनाने नेहमी शुभच ऎकावे डोळ्यांनी कल्यान्मय दृश  दिसवे, आणि स्तवन करितच  आमचे जीवन व्यतित व्हावे. इन्द्र ज्याची किर्ति आम्ही पुर्वापार पासुन आमच्या वृद्धा कडून ऐकित  आहोत तो आमाचे कल्याण करो.  विश्वदेव पुषा ( सुर्य ), ज्याची असामान्य गति आहे असा  तार्क्ष्य (गरूड) ,व  बृहस्पती जीवन सुख  (वृद्धिंगत) आमचे करो  श्री गजाननास प्रार्थना करतो  की माझे तसेच  
त्या सर्व जनाचे जे ह्याचे पठण करतात त्याचे रक्षण कर.


अथर्वशीर्ष व अर्थ




ॐ नमस्ते गणपतये || त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि || त्वमेव केवलं कर्तासि || त्वमेव केवलं धर्तासि || त्वमेव केवलं हर्तासि ||त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि || त्वं ( त्वौं ) साक्षादात्मासि नित्यम् ................||१||


हे गणेशा तुला आमचा नमस्कार कारण तूच आदितत्व, जगाचा निर्माता,स्वंरक्षक, संहारक,तू ब्रम्ह व शाश्वत आहेस.  


ऋतम् वच्मि || सत्यं ( सत्यौं ) वच्मि .......... || २||

परमात्म्याच्या ऋत आणि सत्य या दोन्ही अंगाना ध्यानी घेवुनच मी त्याची प्रार्थना करित आहे.


अव त्वं माम्‌ || अव वक्तारम् || अव श्रोतारम् || अव दातारम् || अव धातारम् || अवानूचानमव शिष्यम् || अव पश्चात्तात्‌ || अव पुरस्तात् || अवोत्तरात्तात् || अव दक्षिणात्तात् || अव चोर्ध्वात्तात् || अवाधरात्तात् || सर्वतो मां पाहि पाहि समंतात् ............||३||


हे देवा तू  माझे, तुझे गुनगान करणारे,श्रोत्याचें ( ज्ञानदात्या )गुरूचें,शिष्याचे,सर्व अंगानी व सर्व दिशानि व सर्व बजुनी रक्षण कर.





त्वं वाङ्‌मयस्त्वं चिन्मय: || त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: || त्वं ( त्वौं )सच्चिदानंदाद्वितीयोऽसि | त्वं ( त्वौं ) प्रत्यक्षं ब्रह्मासि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ............||४||


हे गणेशा तू चैतन्यमय ,आनन्दरूप ,व  ब्रम्ह आहेस. तू  सत्, चित् व आनंद या रुपनिय   युक्त अस एकच तत्व आहेस. या जगाचे तू   ज्ञान आणि विज्ञान आहेस.


सर्वं जगदिदं त्वत्तो जायते || सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति || सर्वंन् जगदिदं त्वयि लयमेष्यति ||
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ||त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: || त्वं चत्वारि वाक्पदानि ............||५||



हे  देवा ह्या जगाच निर्माता, स्थिरता, व पंच महाभुत तुच आहेस आणि वाणीची जी चार रुपे (  परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी  ) ती पन तुच आहेस.


त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: | त्वं कालत्रयातीत: | त्वं अवस्थात्रयातीतः ।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् || त्वं ( त्वौं ) शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् || त्वम् ब्रहमा त्वम् विष्णुस् त्वम् रुद्रस् त्वम् इन्द्रस् त्वम् अग्निस् त्वं ( त्वौं ) वायुस् त्वम् सूर्यस् त्वम्‌ चंद्रमास् त्वम् ब्रह्मभूर्‌भुव: स्वरोम् ............||६||.


हे देवा गजानाना तू  सत्व, रजस् व तमस्  या त्रिगुणांच्या, स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह या देहत्रयांच्या , जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था या तीन अवस्थांच्या व ,भूत, वर्तमान व भविष्यत् या तिन्ही कालांच्या, पलीकडचा आहेस. तू मूलाधारचक्रांत स्थित आहेस,तिन्ही शक्तींचा (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति )आत्मा आहेस, योगिजन तुझी ध्यान साधना करतात कारण तू रूद्र,  इंद्र,  अग्नि,  वायु,  सुर्य,  चंद्र, ब्रह्म,  भू:,  भुव:,  स्व: व  ॐकार आहेस.







गणादिम् पूर्वमुच्चार्य वर्णादिस्‌ तदनंतरम् | अनुस्वार: परतर: | अर्धेन्दुलसितम् | तारेण ऋद्धम् | एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नादः संधानम् || संहिता (सौंहिता ) संधिः | सैषा गणेशविद्या | गणक ऋषि: | निचृद्‌गायत्रीछंदः गणपतिर्देवता | ॐ गं गणपतये नम: ...........||७||



’गण’ शब्दाचा आदिवर्ण ‘ग्’ याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण ‘अ’ याचा उच्चार केला गेला व . त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त  हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु उत्तररूप होय. यांचे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि.होय.आणि  हीच ती गणेशविद्या. या मंत्राचा गणक ऋषी आहे. निच्ऋद्गायत्री हा छन्द प्रकार)आहे. गणपति देवता आहे. ‘ॐ गं गणपतये नम:।‘


एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् ...........|| ८ ||


आम्ही एकदन्त गजानानास  जाणतों आणि  वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा देओ ही त्याच्या चरणी प्रार्थना .


एकदंतं चतुर्हस्तम् पाशमंकुशधारिणम् || रदं च वरदं ( वरदौं ) हस्तैर्‌बिभ्राणं मूषकध्वजम् | रक्तम् लंबोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् || रक्तगंधानुलिप्तांगम् रक्तपुष्पै: सुपूजितम् | भक्तानुकंपिनम् देवं जगत्कारणमच्युतम् | आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम् || एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनां(उं) वर: |.............|९||


एक दांत असलेला, चार हात असलेला,  अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, रक्तचंदनाच्या गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा,व  तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें रक्षण करणारा अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, ज्याचे   जो नित्य नमाने  ध्यान करतो तो योगी असतो व सर्व  योग्यांत श्रेष्ठ म्हणवला जातो.

नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नम: .......|| १० ||


जो व्रतांचा, तपश्चर्याचा अधिपती आहे  या आशा गणांच्या नायकास नमस्कार ,लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्री वरदमुर्तीला नमस्कार .


एतदथर्वशीर्षम्‌ योऽधीते || स ब्रह्मभूयाय कल्पते || स् सर्वविघ्नैर्न बाध्यते || स सर्वत: सुखमेधते || स पञ्चमहापापात्प्रमुच्यते || सायमधीयानो दिवसकृतम्‌ पापन्‌ नाशयति || प्रातरधीयानो रात्रिकृतम्‌ पापन्‌ नाशयति || सायं प्रात: प्रयुंजानो अपापो भवति || सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति || इदम्‌अथर्वशीर्षम्‌ अशिष्याय न देयम्‌|| यो यदि मोहाद्दास्यति || स पापीयान्‌ भवति || सहस्रावर्तनात्‌ यं (यैं) यं काममधीते तं तमनेन साधयेत्‌..............||११||


या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो.या  पांचही हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग मुक्त होतो.  संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप  रहित होतो . सर्व ठिकाणी या  अथर्वशीर्षाचे     अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष अशिष्य-भाव असलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी  मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी मनुशाच्या सर्व कामना सिद्ध होईल .


अनेन गणपतिम्‌ अभिषिंचति || स वाग्मी भवति || चतुर्थ्यामनश्नञ्जपति || स विद्यावान्भवति || इत्यथर्वणवाक्यम्‌|| ब्रह्माद्यावरणं (णौं) विद्यात्‌||
न बिभेति कदाचनेति .............|| १२ ||



या अथर्वशीर्षानें जो गजननाचे  अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें म्हणणे आहे. या अथर्वशीर्षाचे  जप करणार्याीला ब्रह्म व आद्या (माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं.








यो दूर्वांकुरैर्यजति || स वैश्रवणोपमो भवति || यो लाजैर्यजति || स यशोवान्भवति ||
स मेधावान्भवति || यो मोदकसहस्रेण यजति || स वांछितफलमवाप्नोति ||
यः साज्यसमिदभिर्यजति || स सर्वम् लभते स सर्वम् लभते || अष्टौब्राह्मणान्‌सम्यग्राहयित्वा  || सूर्यवर्चस्वी भवति || सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्‌त्वा सिद्धमंत्रो भवति || महाविघ्नात्प्रमुच्यते | महादोषात्प्रमुच्यते || महापापात्प्रमुच्यते ||
स सर्वविद्भवति स सर्वविद्‍भवति || य एवं वेद इत्युपनिषत्‌ ..............||१३||


जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते,  आठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. जो हा  मंत्र सिद्ध करिल तो  महाविघ्नापासून , महादोषापासून , महापापापासून मुक्त होतो. जो हें असें जाणतो तो सर्वज्ञ ,सर्वसंपन्न होतो,  असें हें उपनिषद् आहे.






शान्तिमंत्र :
ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै | तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै || ॐ शांति : शांतिः शांति : |

ॐ भद्रंकर्‌णेर्भिः शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर् व्यशेम देवहितं यदायु: ||१||

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्‌क्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्‌दधातु ||२||

ॐ शांति : शांतिः शांति :


। इति श्री गणपती अथर्वशीर्ष: समाप्तः ।

       
       // गणपति बाप्पा मोरया //
       

     //गजानन महाराज की जय //


--------------------------------------------------------------------------------------------------

फोटो गूगल इमेजेस व् सन्दर्भ  विकेपिडिया,इतर धार्मिक ग्रन्थ.