नमो
मी तसा कोणत्याही पक्षाला सोवळा मानीत नाही सर्व पक्ष एका माळेची मणी आहेत पण कॉग्रेसचा दुटप्पीपणा आणि सततचा गुजरात २००२ च्या दंग्यांचा उलेख व एकट्या मोदीस कोंडीत पकडण्याची त्यांची धडपड व आम्ही किती सोवळे हे जनतेस दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून वाटले कि काही सत्ये सर्वां समक्ष यावी ह्या हेतुने लिहले.
मोदी भारतीय राजकारणात तेही गुजरात सोडून केंद्रीय नेतृत्व करण्यास समर्थ आहेत असे जेव्हा भाजपा नेत्यांची दुसरी फळी सांगत होती आणि पक्षांत वाढते समर्थन त्याच बरोबर हालचालींना वेग आला व त्यांना २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची भाजपची कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली गेली. तेव्हा पासून कांग्रेसचे नेते सर्व बाजूने त्यांच्यावर तुटून पडत आहेत . ह्या सर्व कॉग्रेसी मंडळींचा एकच लक्ष ते म्हणजे २००२ मधील गुजरात दंगे आणि त्यासाठी मोदींना जवाबदार आणि अल्पसंख्याकाच्या झालेल्या हत्या ( गोध्रा कांड ) घडवून आणल्याचा आरोप करीत आहे. पण आश्चर्य याचे वाटते कि ह्यांच्या युवराजांवर बलात्काराचा आरोप होतो ( सुकन्या सामुहिक बलात्कार केस ) ह्यावर कोणीच बोलत नाही ना त्यांना जाब विचारला जातो . एखाद्यावर गंभीर आरोप होत असताना त्यांना भारताचे भावी पंतप्रधान बनविण्याचे स्वप्न कसे बघू शकतात? सुकन्या आणि तिचा संपूर्ण परिवार ह्या घटणे नंतर गायब झाले ते कसे व कोणी केले ह्याचे उत्तर अध्याप जनतेस मिळाले नाही .
नरेंद्र मोदिनी गुजरात मध्ये शेती उत्पन्न १० ते १२ टक्क्यांनी वाढविले , आशिया खंडातील सर्वात मोठे सोलर प्रकल्प आपल्या राज्यात उभारले.गुजरात हे एकमेव राज्य आहे जे आपल्या १८००० गावांना चोवीस तास एलेक्ट्रिसिटी पुरविते इतकेच नाही तर जागतिक ब्यांकेच्या २०११ च्या अहवाला नुसार गुजरात मधील रस्ते हे जागतिक दर्ज्याची आहेत असे नमूद केले .
फोर्बोस मासिकाने अहमदाबादला जगातील तिसरे शहर जे अत्यंत वेगाने प्रगती पथावर असल्याचे नमूद केले. गुजरात राज्य हे पर्यटन क्षेत्रात सर्वात आघाडीवर आहे. सर्वात कडी म्हणजे भारत सरकारच्या लेबर खात्याच्या अहवाला नुसार गुजरात राज्यात सर्वात कमी प्रमाणात बेकारी आहे तरीही कांग्रेस ह्यावर चकार शब्द्द बोलण्यास तय्यार नाही .सन २००३ ते २०१३ ह्या दहा वर्षात गुजरात मध्ये एकही जातीय दंगल झाली नाही ह्याचे श्रेय मोदीस देण्यास तय्यार नाहीत.
नरेंद्र मादी ह्यांच्याच कारकिर्दीत दंगे झाले असे नाही तर ह्याच गुजरात मध्ये कांग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेले दंगे कसे विसरतात? आणि त्याचे उत्तर्दाइत्व कोण घेईल?
१ ) १९६९ अहमदाबाद दंगा ५१२ मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
२ ) १९८६ अहमदाबाद दंगा ५९ मृयुमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
३ ) १९९२ सुरत दंगा १७५ मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
ही झाली नुसत्या गुजरात राज्यातील दंग्यांची यादी आणि त्यावेळी कॉंग्रेसची राजवट होती . इतर राज्यात पण हेच राज्य शाषक होते त्या राज्यात पण दंगे झालेत मग त्या सर्व मुख्यमंत्र्यांना जवाबदार का धरू नये फक्त मोदींनाच का ?
१ ) १९४७ बंगाल पांच हजार ते दहा हाजार मृत्युमुखी पडले शाषक का
कॉंग्रेस.
२ ) १९६४ रोउरकेला २००० मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
३ ) १९६७ रांची २०० मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
४ ) १९७० भिवंडी ८० मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
५ ) १९८३ आसाम ५००० मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
६ ) १९८४ दिल्ली शीख विरोधी दंगा २७३३ मृत्युमुखी पडले शाषक
कॉंग्रेस .
७ ) १९८७ मेरठ ८१ मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
८ ) १९८९ भागलपूर १०७० मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
९ ) १९९२ मुंबई ९००-२००० मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
१० ) १९९२ अलिगढ १७६ मृत्युमुखी पडले शाषक कॉंग्रेस .
वरील सर्व दंग्या बाबत मौन बाळगतात कारण त्याच्या जवळ लोकांना पटतील अशी उत्तरे नाहीत हेच खरे आहे. मतांचे राजकारण म्हणजे अल्पसंख्याकांचे मते मिळविण्यास कुठल्याही थराला जाण्याची तयारी आणि हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाना नामोहरम करणे तसेच जनतेची दिशाभुल करणे खोटी आश्वासने देणे आणि अंतिम ध्येय सत्ता काबीज करणे .
भारतीय तरुण मतदार हे सर्व बघून म्हणतो कि " आम्हाला २००२ मध्ये काय घडले ह्याची गरज वाटत नाही पण २०२२ साली काय होईल ह्याकडे अधिक उत्साही आहोत " त्या दृष्टीने कोणता पक्ष कोणता कार्यक्रम आखतो व त्यायोगे भारतास जगात शक्तीशाली देश बनविल त्यालाच राज्य करण्याची संधी दिली जाईल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा