शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.



हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.
सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष  काढले  जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण  इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या  बहुदेव वादाची कल्पना  स्वयं ऋग्वेदच करतो.
ज्याला लोक इंद्र, मित्र, वरुण असे संबोधितात ते सर्व एकच आहेत .त्यांची ऋषिमुनी वेगवेगळ्या नावाने आराधाना करतात. वास्तविक पाहता पुराण तर वेगवेगळ्या पंथांच्या निर्माणात गुंतला गेला आहे.
पण ह्याच पुराणात काहीं श्लोक ईश्वराच्या एकत्वाची स्पष्टता करतात जसें...



सत्त्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तै-
र्युक्त: पर: पुरुष एक इहास्य धत्ते
स्थित्यादये हरिविरंचि हरेति संज्ञा:

 श्रेयांसि तत्र खलु सत्त्ववतनोर्नृणां स्यु: ।


प्रकृतीचे तीन गुण आहेत सत्व, रज, तम, ह्यांचा स्वीकार करूनच संसारात स्थिती, उत्पत्ति आणि प्रलय ह्या करता अद्वितिय परमात्मा विष्णु, ब्रम्हा आणि रुद्र अशी  नावे धारण केली आहेत.

वरवर बघता आपणास असे दिसते कि हिंदू हें वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य ह्या संप्रदायांत वाटला गेला आहे. सत्य हे आहे कि हिंदू विष्णु (सर्वव्यापी ईश्वर), शिव (कल्याणकर्ता ईश्वर), दुर्गा (सर्वशक्तिमान ईश्वर), गणेश (परम बुद्धिमान वा  सामूहिक बुद्धिचा  द्योतक ईश्वर) ह्यांची उपासना करतो. सर्व हिंदू विष्णु, शिव,दुर्गां व काली  मंदिरांत जाऊन श्रद्धा युक्त होऊन नतमस्तक होतो. म्हणून सर्व हिंदू एक आहेत मग तो काणत्याही संप्रदायाचा असो असे यावरुन निश्चित आहे.

उपनिषीधात खरें तर " एकत्व " जोडण्याच प्रयत्न केलेला दिसतो आणि ज्ञानी लोकांनी असा निष्कर्ष काढला कि जीवात्मा आणि परमात्मा या दोहोत अग्नी आणि त्याची दाहकतेचा जसा संबंध असतो तसाच संबंध आहे. ईश्वर कुठेही दुसरीकडे नाही अपितु तो आपल्या हृदयांत वसलेले आहे. सर्वत्र तो आहे व तो सर्वव्यापी परमात्माच सर्व काहीं आहे. म्हणूनच त्याची स्तुती आणि प्राथना केली जाते.


तेजो सि तेजो मयि धेहि, वीर्यमसि वीर्य मयि धेहि, बलमसि बलं मयि धेहि, ओजोसि ओजो मयि धेहि ।     (यजुर्वेद १९-९)

हे भगवन तुम्ही तेजोपुंज आहात माझ्यात तेज स्थापीत  करा ,आपण वीर्य रूप आहात मला वीर्यवान बनवा, आपण बालरूप आहात माला बलवान बनवा, आपण ओज स्वरूप आहात मला ओजस्वी बनवा अशी प्रार्थना व स्तुती केली आहे.

वेदात वैश्वीकरणावर अधिक बळ  देऊन  म्हंटले आहे ...



अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।



हे माझे आणि ते त्याचे आहे असा विचार कोत्या मनाचे लोक करतात पण उदार व चारित्र्यवानासाठी तर हें जगच  एक कुटुंब आहे.




सामाजिक ऐकताचा  संदेश पण यांत आहे तो असा---
सह नाववतु सह नौ भुनुक्तु । सह वीर्य करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । शान्ति: शान्ति: शान्ति: ।
हें देवा आम्ही परस्परांची रक्षा करावे, सर्वांनी मिळून उपभोग घ्यावा, एकमेकांच्या साह्याने सामर्थ्य व तेजस्वी बनु, विद्या, बुद्धी वृधिंगत होऊन विद्द्वेषा पासुन दूर राहु अश्या प्रकारे सर्वत्र शांति नांदो .

सार्वभौम भ्रातृत्व व सार्वभौम कल्याणणासाठी पण यांत उलेख आहे तो असा----
सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत् ।



सर्व सुखी होवोत,सर्व निरोगी राहोत, सर्वांनाच आपले शुभ दर्शन होवो आणि त्यांचे दु:ख हरो.
-----------------------------------------------------------------------------------------------------
( मुळ लेखन ( इंग्रजी ) श्री विवेक मिश्र यांचे चे हें भाषांतर आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: