जस जसें वर्षे जात आहेत यु पी ऐ सरकारच्या कारभाराची तस तशी घोटाळ्यांची पण वाढती कमान दिसत आहे. ह्या सर्व घोटाळ्यांची माहिती गोळा करीत असताना असे दिसून आले कि प्रत्येक वर्षी ह्यांची चढती भाजणीच आहे हें खालील संगृहीत केलेल्या आकडेवारी वरून दिसून येईल.
साल.................. घोटाळे.
२००८ ७
२००९ ९
२०१० २३
२०११ -१२ २२ ...... आता पर्यंत.
असे नाही की स्वातंत्र्य प्राप्ती नंतर घोटाळे झाले नाहीत पण सध्याच्या तुलनेने फारच कमी होतें किवां ते उजेडात येत नव्हते . पण हाल्लीची
राजकीय नेते मंडळीनी केलेल्या घोटाळ्यांचा काहीं अंतच लागेना रोज नवी घोटाळा जनते समोर येत आहे आणि त्यांतील रकमा बघूनच जनतेचे तोंडचे पाणी पाळले.
कोणीही हें नाकारणार नाही की खिचडी ( coalition ) सरकार चालविणाऱ्याच पक्षाच्या सर्वे सर्वा सोनिया गांधी आणि स्वच्छ चारित्र्याचे आपले पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा कारभार दिवसे दिवस भ्रष्टाचारी लोक चालवत आहे. आणि आता पर्यंतची आकडेवारी बघता जवळ जवळ छोटे मोठे घोटाळे मिळून ८० च्या जवळ गेलेत व ह्यात गुंतलेला पैसा जवळ जवळ १९ लक्ष करोड इतका आहे आणि ह्यांत काळा पैसा जो स्विस ब्यांकेत आहे जमेस धरल्यास भारताच्या अर्धा GDP २०११-१२ इतका होईल.
भारतीय न्यायव्यवस्था जागरूक व कर्तव्यदक्ष असल्यामुळे बरेच घोटाळे भारतीय जनतेसमोर आलेत. कमीत कमी तात्पुरते कां होईना राजकीय शक्तींवर बराच दबाव आला जें भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालत असत. टेलिकॉम मिनिस्टरला राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली.
एक कॉंग्रेस खासदार CWG घोटाळ्यात सापडला, आणि त्याला संपूर्ण उन्हाळा व हिवाळा जेलच्या कोठडीत घालवावी लागली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चव्हाण,देशमुख याना पाय उतार व्हावे लागले कारण आदर्श हौसिंग घोटाळ्यांत CBI ला यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले व त्यानी आपल्या चारशिट मध्ये तसा उल्लेख ही केला.
दोन पूर्व मुख्यमंत्री गोवा राज्याच्या खाण घोटाळ्यात असल्याचा CBI शोध घेत आहे. कर्नाटकाचे भाजपा पूर्व मुख्यमंत्री येद्द्युराप्पा पाय उतार झाले व त्यांच्यावर क्रिमिनल केसेस टाकण्याची तयारी चालू आहे. बंगारू पूर्व भाजपा लक्षुमण अध्यक्ष १ लक्ष रुपये घेताना पकडले गेले. तसें बघितले तर अजून किती लोक अश्या घोटाळ्यांत सापडतील काहीं सांगता येत नाही.
आता ह्या सर्वांची सही सलामत सुटण्याची भिस्त फक्त नावाजलेले वकील व निस्वार्थ बुद्धिने आपले कर्तव्य बजावणारे न्यायाधीश हें सर्व रिटायर होणे (जें विकले जात नाहीत )यांच्यावर आहे जर असे झाले तर ही फार दुर्दैवाची गोष्ट भारतीय जनतेसाठी असेल.
राजकीय नेते व सरकारी अधिकारी सर्वांनी मिळून लाज लज्जा पार सोडून दिली असे आजकाल दिसते .पूर्वी जरा तरी देश भावना जाणून काहीं लोक तरी जनतेसाठी चांगल्या लोकाभिमुख कामाची आखणी करीत. पण सध्याच्या राजकारणात लोकौपयोगी सोडून स्व -उपयोगी कामांना जास्त प्राधान्य दिले जात आहे. खरें तर त्यांची विश्वासहार्ता लोकांना नाही कारण त्यांच्यावर असलेले घोटाळ्यांचे केसेस कोणत्याही प्रकारे न्यायालायासमोर आणून शिक्षा देण्याचे ते स्वतः कसे करतील ? कारण हीच मंडळी तर सरकार चालवतात ना.
हेचं बघा ना Schweizer या स्विस मासिकाने १९९१ मध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केला त्यांत त्यांनी राजीव गांधीचे गुप्त खाते आहे आणि त्यांत $ २.५ बिलियन जमा आहेत. हें $ २.५ बिलियन पैसे आता पर्यंत व्याजासकट $ १० बिलिअन रुपये झाले असतील ( आकडे अमेरिकन ट्रेजरीच्या रेट प्रमाणे आहेत. )
रशियन पत्रकार येवगेनिया अल्ब स ( Yevgenia Albats ) आपल्या नोंदवहीत असे लिहून ठेवले कि रशियन गुप्तहेर संघटना के .जी .बी .ने काही कागद पत्रात असे नमूद केले कि गांधी घराण्याला " कृतज्ञता " म्हणून पैसे देत होतें.
हें वृत्त सर्व जगातील वर्तमानपत्रांतून १९८८,१९९२, २००२. २००६ आणि २००९, २०१०,२०१२ हिंदू, टाईम्स ऑफ इंडिया, स्टेटमन, इंडिया टुडे इत्यादि प्रसिद्ध झाले तरी पण सोनिया गांधी परिवार आणि राज्यकर्ते सर्वजन आता पावेतो मौन धारण करून आहेत. ह्या बातमीवर ब्र सुद्धा काढीत नाहीत ना भारत सरकार कुठलीही कारवाई करीत नाही कारण राज्याचे हेचं तर सर्वे सर्वा आहत. बरे ही बातमी जर खोटी असती तर ह्यानी सर्व वर्तमान पत्रावर मानहानीचा दावा केला असता नाही का?
दुसरी गोष्ट म्हणजे " बिझिनेस ईनसाईडर ' अमेरिकेतील मासिकाने जगातील सर्वात श्रीमंत राजकीय लोकंची यादी प्रसिद्ध केली त्यांत सोनिया गांधी यांची मालमता जवळ जवळ ४ ते १९ बिलिअन आणि जगात त्यांचा ४था नंबर लावला. त्यांच्यावर फक्त सौदी राजे, ब्रुनैलचे राजे, व न्यूयार्क चे मेयर मिचेल ब्लूमबर्ग ह्या महान हस्ती आहेत.
एवढे जगातील लोकउघडपणे सर्व आकडेवारी प्रसिद्ध करीत आहेत तरी पण आपले सरकार आणि गांधी परिवार हु कां चु करीत नाहीत, हें सरकार त्यांचे आहे पण खरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपोझिशन पार्टी पण मुग गिळून बसलेत हें काहीं कळत नाही.
हा भ्रष्टाचार रुपी रोग आता न्याय व्यवस्थेत पण दिसून येत आहे जी. के. बालकृष्णन भूतपूर्व चीफ जस्टीस व सध्याचे ह्युमन राईट कामिशन मुख्य त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या तीन नातेवाईका जवळ हजरो रुपयांची मालमत्ता व काळा पैसा मिळाला .तसेंच जस्टीस पी.डि. दिनकरन चीफ जस्टीस हाईकोर्ट यांच्यावर जमीन बळकावणे आणि काळा पैसा ह्यासारखे आरोप लागलेत. ही दोन एक उदाहरणे सोडल्यास अजून तरी आपली न्यायव्यवस्था बर्यापैकी भ्रष्टाचारापासून दूर आहे ही भारतीय जनतेची एक जमेची बाजू आहे.
कॉंग्रेस प्रणीत आघाडी सरकार मधले मुख्य पार्टनर कॉंग्रेस यांच्यावर पैसे देवून मत मिळवण्याचा भ्रष्ट प्रकार संसदेतच नोटांचे बंडले दाखवून उघडकीस आणले तरी, ते देशावर राज्य करत आहेत आणि लूट पण.
श्रीमंत माणसे उतरोउतर आपल्या श्रीमंतीचा डाम डौल व भपका निर्लज्यपणे दाखवताना दिसतात. मुकेश अंबानी रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्व यांनी मुंबईत करोडो रुपये खर्चून आपले निवास्थान बनविले आणि सबंध मिडिया व राजकीय लोक त्याचे स्वागत करताना दिसले. सगळीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हां आपणस सर्वीकडे निर्लज्यपणाचा कळस गाठलेला दिसतो. फक्त साधारण ( आम आदमी ) माणूस अजून तरी लज्जा बाळगून आहे.
सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार , अराजकता, स्वहित,अश्या गुणांनी बरबरटलेला असल्यामुळे सर्व काहीं आलबेल आहे असे म्हणण्यास कोणीही धजावत नाही. म्हणूनच सर्व जनता राजकारण, संसद, आणि न्यायव्यवस्थे पलीकडे जाऊन आपल्या जिवनात काहीं चांगले होईल ह्या आशेवर आण्णा हजारेकडे व त्यांच्या भ्रष्टाचार आंदोलनाकडे आशाळभूत नजरेने बघत आहे. पण आतां जनतेस असे वाटत आहे कि अण्णाचे आंदोलन थोडेस भरकट आहे कदाचित ह्यातून काहीं निष्पन्न होईल की नाही अशी शंका निर्माण होत आहे. आंदोलनाची दिशा , मार्ग, व सहकारी ह्याचा म्हणावा तसा ताळमेळ दिसत नाही ज्यामुळे मुख्य उद्देश सफल होणार कि नाही ही भीती वाटते. अशावेळी जनतेची हाक कोण ऐकेल हा प्रश्न भेडसावतो आहे.
श्रीमद्द भागवत गीता जें १२०० वर्षा पुर्वी रचीयले आहे त्यांत कलियुगाचे विस्तृत वर्णन आढळते
" कलियुगात चोर राज्य करतील, राज्यकर्ते लोभी आणि अमानुष वागतील. दरोडेखोर,लुटारू यांची चलती होईल, व्यापार हा सरळ मार्गाने न होता तो लोकाना फसवून केला जाईल, लबाड लोक व्यवसाय आणि व्यापारांत शिरतील व लूट करतील, गरिबी हाच मोठा गुन्हा समजला जाईल न्यायदानात, भक्कम डाम डौल हा मोठा श्रीमंतांचा बडेजावपणा दाखवेल व तसेंच त्यांचे चरित्र ही , ज्याला जास्त ओंगळ शब्दांचे प्रयोग करता येतील तो विद्वान समजला जाईल, असभ्यता हाच खरा चारित्र्याचा गाभा असेल, नैतिक मुल्यांचा ऱ्हास होईल "
हें सर्व काहीं आताच्या परिस्थितीत होत आहे आणि उतरोतर होत राहील .
सरते शेवटी इतके सारे सांगत असताना भगवंतानी एक दिलासा देणारी गोष्ट सांगितली ती म्हणजे जेव्हा जेव्हा असे काहीं घडेल तेव्हा भगवंत नवा अवतार घेऊन ह्या सर्वांचा निःपात करतील.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भावति भारत / अभ्युत्स्थानमधर्मस्य तदात्मानं सृजम्याहम /
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम / धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे //
भावार्थ :-- जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानि होतें आणि अधर्माचे प्राबल्य माजते , तेव्हां मी स्वतःला उत्पन्न करितो. साधूंचे संरक्षण , दुष्टांचा नाश आणि धर्मसंस्थापना ह्यांसाठी मी युगायुगांत उत्पन्न होतो.
kali avatar
ही एक मोठी आशा आहे भारतीय जनतेस की खरेच भगवंत " कली " अवतार घेऊन सर्व दुष्टांचा नाश करतील आणि सामान्य जनतेस यातुन मुक्त करतील का?
---------------------------------------------------------------------------------
श्री यस. गुरुमूर्ती यांच्या स्तंभ लेखा वरून ( ९ मे २०१२ इंडिअन एक्स्प्रेस ) प्रोछाहित होवून वैचारिक लेख लिहिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा