आशुतोष व अनामिका ह्यांच्या लग्नाला आता जवळ जवळ ८ वर्षे होत आली तरी पण अनामिकीला वाटते कि ती आशुतोषला पूर्णपणे समझू शकले नाही. असे बिलकुल नाही कि दोघे ही एकमेकावर जीवापाड प्रेम करतात तरी पण अनामिकाला का बरे असे वाटते कि ती अजून आशुतोषला समजू शकले नाही ?
जेव्हा केव्हा दोघा मध्ये वाद विवाद होतात तेंव्हा आशुतोष असे काहीं बोलून जातो कि ज्याची अनामिकाला मुळीच आशा नसते तो असा काहीं बोलेल. ह्याचमुळे तिला वाटते कि आशुतोष तिच्या भावनांची कदर करीत नाही. असे नाही कि असे फक्त अनामिकालाच वाटते पण काहीं वेळा खुद्द आशुतोषला पण वाटते कि अनामिका त्याच्या समाश्या समजण्यास असमर्थ आहे आणि याच समजुतीनें तो तिला आपले सर्व गोष्टी सांगत नाही किवां सांगण्यास बिचकतो जर, तिने त्याचा भलताच अर्थ घेतला तर.....?
ही कहाणी जवळ जवळ सर्व घरात आपणास दिसून येईल. पती व पत्नी यांचा कितीही चांगला संसार चालला असेल व दोघेही एकमेकाशी जुळवून घेत असतील पण भांडण ,वाद विवाद जरूर होतातच.
ह्या भांडणाच्या वेळी पत्नीस असे वाटते कि आपला जोडीदार आपल्या भावनाची कदर करीत नाही. उलट पक्षी पती पण आपल्या पत्नीच्या विचाराने व्यथित होतो. पण....वास्तव्यात अशी कोणतीही गोष्ट नसते कारण वैद्य्निक द्रष्ट्या बघितल्यास आपणास वेगळेच कारण दिसेल.
नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्यालिफोर्निया च्या संशोधकांच्या एका पाहणीत असे आढळून आले कि एकाच गोष्टीवर पुरुष आणि स्त्री यांची मते भिन्न असतात. कां नेहमी असे होतें कि वाद विवादात स्त्रीस पुरुष हा अति संवेदनाशील वाटतो ?
श्रीमती लावनिया म्हणते कि " मी जेव्हा ,जेव्हा अत्यंत महत्वाची गोष्ट माझ्या पतीस सांगते तेव्हां ते एक तर वर्तमान पत्र वाचत असतात किवां टी.व्ही बघत असतात माझ्या बोलण्याकडे त्यांचे अजिबात लक्षच नसते. ह्याचा मला अतोनात राग येतो कारण ते मला व माझे म्हणण्याला मुळी गांभीर्याने घेतच नाहीत असे वाटते. पण आश्चर्याची बाब म्हणजे अशी कि ते माझे सर्व म्हणणे ऐकतात व त्यावर आपले मत पण माडतात.
सायन्स डेली डॉट कॉम च्या प्रमाणे पुरुष हा हावभाव नबघता आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही त्या उलट स्त्री नेहमी हाव भावला जास्त प्राधान्य देते. आश्चर्य याचे वाटते कि स्त्री व पुरुष शारीरिक रूपाने वेग वेगळे आहेत पण एकाच गोष्टी वर दोघांची मते सुद्धा भिन्न असतात. तणावपूर्ण जिवनशैलीमध्ये पुरुष एखाद्या गोष्टीवर जसा विचार करतो तसाच विचार स्त्री करीत नाही. स्त्री अश्या परिस्थितीत भावनाना अधिक प्रधान्यता देते पण पुरुष मात्र व्यवहारिक दृष्ट्या विचार करतो.
मनोवैध्यानिकांचे असे मानने आहे कि स्त्री व पुरुष यांच्या मेदूची रचना वेगवेगळी असते आणि याच कारणामुळे एकाच समस्येवर दोघे वेगवेगळे विचार करतात म्हणूण एकमत बनवू शकत नाहीत. म्हणून पुरुष स्त्री पेक्षा श्रेष्ठ आहे किंवा स्त्री आहे असे म्हणणे किती चुकीचे व मूर्खपणाचे आहे हें दर्शविते. ऐकूण काय तर पुरुष व स्त्री हें एकमेकाना पूरक असू शकतात पण कोणी एक एका पेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होऊ शकत नाही. त्यांचे विचार ,मते भिन्न असतात कारण त्यांची " ब्रेन केमिस्ट्री " वेगवेगळी असल्या कारणाने त्यांचे भांडण्याचे ढंग पण भिन्न असतात.
मा ना बासरकर
---------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा