विजया दशमी ---
हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कारण हा साडेतीन मुहूर्तातील एक आहे. अयोध्याचा राजा श्रीरामचंद्र ह्यांनी याच दिवशी लंकेच्या रावणाचा पराभव करण्यास प्रस्थान केले .पांडवांचा अज्ञात वास संपल्या नंतर याच दिवशी त्यांनी शमी वृक्षाची पूजा करून आपली शास्त्रे झाडावरून काढली .
अष्टभुजा देवीने महिषासुर
या दिवशी सीमोल्लंघन करण्यास गावाच्या ईशान्य दिशेकडे जावे व तिथे शमी अगर आपट्याच्या झाडाची पूजा करून त्याची पाने "सोने " म्हणून आपल्या आप्त मित्रांत वाटावी.
असे म्हणतात कि पूर्वी खरें सोने देत असत पण विसाव्या शतकात ही चाल आपट्याची पाने देवूनच प्रथा पूर्ण करावी लागते. काहीं लोक जनावारचे बळी पण याच दिवशी देवीला चढवतात पण ही प्रथा हळू हळू बंद व कमी होत चालली आहे.
" शमी शमयते पाप शमी लोहितकंटाका /
धरित्र्यर्जुन प्रियवादिनी बाणानं रामस्य //
करिष्य मागयात्रायां यथाकालं सुखं मया/
तत्र निर्विघ्नकत्रीत्व भवमी रामपूजिते "//
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.........!!!!!!!
छाया चित्रे गूगल इमेजेसच्या सौजन्याने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा