मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

नवरात्री उत्सव -घटस्थापना.



नवरात्री उत्सवाच्या  आपल्या सर्वाना शुभेच्छा................!!!!!!!!!








अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नऊ दिवस असल्यामुळे यासं " नवरात्रौत्सव " असे म्हणतात .

 अश्विन शुद्ध प्रतिपदेस देवीचा नऊ दिवसाचा आपापल्या कुलाचार प्रमाणे घरात घटस्थापना  करतात. पंचमीच्या दिवशी काहीं ठिकाणी ललिता देवीची पूजा केली जाते आणि या दिवसाला "ललिता पंचमी " असे म्हणतात.






 अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी देवीची आरती व स्त्रियांचे घागरी फुंकणे हा  कार्यक्रम असतो  यावेळी  काहीं स्त्रियांच्या देवि अंगात येते किवां दिवीचा संचार होतो असे म्हणतात. प्रतिपदेच्या दिवशी देवीची पूजेची   सुरवात  संकल्पाने होतें ते असे.



 " मम सकुटुंबस्य त्रिगुणात्मक श्रीदुर्गां प्रीतिद्वारा सर्वापच्छांति पूर्वक दिर्घायुर्धन पुत्रादि वृद्धि शत्रुंजय  कीर्तिलाभ प्रमुख चातुर्विद्ध पुरुषार्थ सिद्धर्थ आद्यारंभ्य  नवमीपर्यंत महालक्ष्मी ,महासरस्वती, नवदुर्गा प्रीत्यर्थ माला बंधन अखंड दीप प्रज्वालन पूर्वकं शारदा नवरात्र पूजां करिष्ये " .








 नंतर कलश मांडून त्याचे व देवीचे षोडशोपाचाराने पूजा करावी. 


 

श्री दुर्गा माता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: