शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

खरेच ऑस्मासीस ( Osmosis ) प्रणाली पर्याप्त उर्जेचे श्रोत्र बनेल ?............ नवीन शोध.

ग्लोबल वार्मिंगच्या समस्ये मुळे आपले वातावरण संतुलित राखणे गरजेचे आहे. जगभरात उर्जा मिळविण्यासाठी लाकूड,कोळसा व नैसार्गिक  वायु खर्ची घालत आहोत. त्यामुळे हवामानात बदल होत आहे व आपले स्वंरक्षक छत्र छेदु लागले ही एक गंभीर बाब आहे. ह्या समस्येच्या निवारणासाठी संपूर्ण जग सध्या झटत आहे.

ह्या उर्जेच्या  गर्जे पोटी अनेक परयाई साधनांचे  शोध कार्य सतत होत आहेत. काहीं परयाई   शोध लागले जसें सोलर ,विंड श्रोत्र ज्यामुळे वीज निर्माण करून पर्यावरणास कमी धोका होईल. असे संशोधन लागले तरी त्याचा म्हणावा तसा प्रचार व प्रसार झाला नाही. ही साधने व त्यांचा व्यापक उपयोग सामान्य जनते पर्यंत अजून तरी म्हणावा तसा पोहचला नाही. कारण ह्या बाबत जन  जागृती  सरकार तर्फे ज्या प्रमाणात व व्यापक व्हायला हवी तेवढी झाली नाही.

भारतात पाणी आणि वीज ह्यांचा इतका तुटवडा आहे कि खेड्यातील महिलेस कोसो मैल जाऊन पाणी आणावे लागते आणि अद्याप बऱ्याच गावांना वीज पोहचलीच नाही हें सत्य आहे. सरकार यां दोन्ही अत्यावशक गोष्टी साठी योजना आखते व पैसा उपलब्ध  केला जातो पण आपले दुर्भाग्य हें कि आपले राजनीतिक मंत्री ते संत्री आपला फायदा बघतात व शेवटी हाती काय येते ते पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही. अश्या योजनाचे मग बारा वाजतात व परत त्यां योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व वेळ जातो.

आतां हेचं बघा नां.... आपल्याकडे इतके पाण्याचे दुर्भिक्ष आहे कि  लोकाना पिण्यास व शेतकऱ्यास शेती साठी पावसावर अवलंबून राहावे लागते. ह्यावर उपाय शोधण्यास कोण्याहि  राजकार्णीस वेळ म्हणून आहे का ?  निवडणूक काळात जनतेस हेचं लोक भर भरून आश्वासनाची खिरात करतात व एकदा कां निवडून आले कि नुसते स्वहित जपतात. बरे, असा कोणताही कायदा नाही कि ज्या द्वारे जो अकार्यक्षम आहे त्यासं त्यां पदावरून खाली आणता येईल. असे करण्यासाठी जनतेस पाच वर्षे थाबावे लागते.


असो, जगातील बरीच राष्ट्रे ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न करीत आहेत व थोड्या का प्रमाणात होईना  त्यानां यश मिळते आहे. पाणी पिण्यासाठी व ईतर वापरा साठी संपूर्ण आखाती देश, अमेरिका, युरोपीय देश, इज्राईल व ईतर लहान देशांनी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून खारे पाणी गोडे करून पिण्यासाठी वापरतात.

खारे पाणी ( समुद्राचे पाणी ) गोडे करण्याच्या प्रक्रियेचा  शोध काहीं नवीन नाही पण भारत हा तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे ह्या सागर संपत्तीचा उपयोग का बरे होत नाही ? जगभर " दिस्यालीणेशान  आफ  सी वाटर " Desalination of sea Water " ह्या प्रक्रियेतून गोडे पाणी मिळविता येते व एकदा का हा  प्लांट लागला कि ह्याचे नियंत्रण काम्पुटर द्वारे संपूर्ण पणे करतां येते व मनुष बळ पण कमी लागतो.

रिलायन्स कंपनीने अशा प्रकारचा प्लांट  भावनगर पेट्रोकेमिकल प्लांट मध्ये इज्राईलहून आयात करून कार्यान्वित केला व असे दिसून आले कि मुनिसिपालीटीच्या पाण्याच्या दरा पेक्षा निम्या खर्चात पाणी  मिळते. पाच एक वर्षा पूर्वी असे वाचनात आले कि बी. ये. आर. सी.( B  A  R  C  )  अस्या प्रकारचे प्लांट विकसित करीत आहे. आणि तो सर्वात प्रथम चेनाई इथे कार्यान्वित केला जाईल.

अश्या प्रकारचे प्लांट  जर सुरु झाले की मग आपल्या राजकारणी मंडळीना पावसाळी कामाच्या नावा खाली खड्डे   खोदण्याचे काम दरवर्षी कशी करता येतील  ?  व कमाई बन्द होइल त्याचे काय ?  तेव्हा उन्हाळी कमाचे कन्त्राट  नाही म्हणजे  पर्यायाने  पैसा नाही जर जनतेचे  भले झाले तर ते राजकारणी  लोकांस परवडणारे  नाही व पुढच्या  निवडनुकांत परत पाण्यासाठी  अश्वासने देता येणार  नाहीत .

असो, थोड़े विषयान्तर झाले मुख्य मुद्दा म्हणजे पारमपारीक उर्जा श्रोता ऐवजी नविन विकसित व पर्यावरणास धोका नसणारा अश्या एका नविन संशोधना बद्दल महिती करुन देणे हा होय पण काय करणार  जनतेच्या  सर्वच प्रश्नांशी राजनीति जोडली गेली आहे म्हणून ओघा ने  वरचे लिखाण आपोआपच आले.

नॉर्वे  ( Norway ) देशाच्या संशोधकांनी  शोध लावला की " ज्या ठीकानी गोड़े पाणी व समुद्राचे खारे पाणी वेगांत  मिसळतात  तेव्हा एक प्रकाची उर्जेची निर्मिति होते आणि त्याचा उपयोग विज निर्मिति करण्यासाठी करता येते."  ह्या सकल्पनेचा एक प्रोटो टाईप पण तय्यार करण्यात  आला व यशश्वी पणे त्यातुन विज निर्मिति केली.

" ओस्मोसिस पॉवर " ज्या मुळे  विज निर्मिति होते त्याचे विश्लेषण खलिल प्रमाने केले आहे.

" Osmosis it is the passage of a liquid from a region where its highly concentrated through a semipermeable membrane to a region of lower concentrations arising the letter's volume. The by-product of that rising volume is energy "


त्यांच्या म्हणण्या प्रमाणे ह्या प्रणाली मध्ये जी उर्जा निर्मिती होतें ती ऑस्मोटिक पावर जी कार्बन मुक्त उर्जा असते आणि आशा आहे कि भविषात ही नवी  उर्जा आता अस्तित्वात असलेल्या उर्जेची जागा घेईल. ह्या उर्जेचे उत्पादन दिवस रात्र सतत चालू राहील.

   नॉर्वेचे श्री. स्कीलधान ह्यांनी असे एक  प्रोटो टाईप नोव्हेंबर २००९ साली टोफ्ला नॉर्वे यां ठिकाणी कार्यान्वित केला. टोफ्ला नदीचे पाणी एका मोठ्या Tank  मध्ये वेग वेगळे सोडण्यात येते व हें दोनीही ( खारे व गोड ) पाणी एका सूक्ष्म फिल्टर ( मेब्रेन ) द्वारे एकमेकात मिसळे जाते. जेव्हा चांगले पाणी जास्त दाबाने खऱ्या पाण्यात मिसळते तेव्हां आणखीन जास्त दबाव निर्माण होतो व ते एका पाईप लाईन  द्वारे जनरेटर मध्ये सोडण्यात येते व त्यां पासून वीज निर्मिती होतें.
 सध्या तरी फक्त ५ के.व्ही इतकीच वीज निर्मिती त्यां प्रोटो टाईप द्वारे होतें. पण भवीषात  अधिक होईल  हें एक महत्वाचे साधन वीज निर्मितीत बनेल अशी आशा वैद्य्नानिकाना वाटते.





                                                        " ओस्मोसिस पॉवर "   प्रोटो टाईप


नासा ( NASA ) आपल्या अवकाश यानात ह्या पद्धतीने पाणी शुद्ध करण्यासाठी सध्या ह्या पद्धतीचा वापर  करीत  आहेत. जर ह्यां प्रकारे वीज निर्मिती होत असेल तर नासा पण आपल्या पुढच्या अवकाश यानात अशी निर्मित वीज  उर्जेचा उपयोग   करून सर्व उपकरणे चालविली जातील व सध्या अस्तित्वात असलेली सोलार पद्धती बदलली जाईल.

अशी आशा आहे कि सन २०३० पर्यंत असे ३० ओस्मोसीस पावर प्लांट बनवून वीज निर्मिती केली जाईल. ह्याच तावानुसार भारतीय वैद्यानिक पण ह्या प्रकारची उर्जा प्रकल्पाची निर्मिती करून विजेचा प्रश्न सोडविण्यास मदत करतील अर्थात भारत सरकार त्यानां योग्य ती साथ देतील आणि या लोक कल्याण कार्यात हातभार लाऊन जनतेस वीज देतील अशी आशां करू........



मा.नां.बासरकर

१७-१२-१०
(वरील माहिती टाईम्स यां मासिकातून संग्रहित )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: