बुधवार, ५ जानेवारी, २०११

बंडखोर जेनिफर ( जेनी )-------

१९९६ साला पासून मी व सौ अमेरिकेस भेट देत आहोत. त्या वेळेची अमेरिका व २०१० ची अमेरिका ह्यात बराच बदल झालेला आहे. अमेरिका हा देश जगातल्या वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या लोकानी बनलेला देश आहे. प्रत्येकानी येताना आपली संस्कृती, परंपरा घेऊन आले आणि तो जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जसाजसा काळ जात होता तस तसा ह्या समाजाचे स्थित्यंतर होत गेले.


आताचा समाज हा अत्यंत आधुनिक व जुन्या परंपरा, सामाजिक बंधने झुगारणारा बंडखोर झाला. समलींगी विवाह, कुमारी माता व स्वैराचार व नव नवीन प्रयोग आणि मुबलक उपलब्धता ह्यामुळे नवीन पीढी बिघडत चालली ह्याचे प्रत्यंतर आम्हास झाले.

त्याचे असें झाले की आम्ही रोज स्ंध्याकाळी जवळच्या बागेत फिरण्यास जातो व पाय मोकळे करण्यास तेथील एका बाकावर विश्रांती घेत असु. त्या बागेत बरीच माणसे यायची त्यात काही नित्य नेमाने येणारी पण होती. ह्या लोकांमध्ये एक देखणी मुलगी एका छोट्या बाळाला रोज बागेत घेऊन येत असे व खेळवत असे . काही वेळा नंतर त्या बाळास तिथेच बागडण्यास सोडून स्वतः एका जवळच्या बाकावर बसून बीयर किवा दुसरे पेय घेत सिगरेट ओढत असे . तिच्या कडे पहिले की वाटे ही मुलगी किती स्व छंदी व आपल्याच मस्तीत आहे. तिचा बेदरकार स्वभाव पाहून वाटले की ह्या तरुण पिढी चे काय होणार.

रोज बागेत फिरण्याच्या सवई मुळे बर्‍याच लोकांची तोंड ओळख झाली व हॅलो, स्मित हास्य रोज होत असे . ती मुलगी व आमची ओळख झाली आणि एकमेकाशी बोलण्यास लागलो. इकडच्या तिकडच्या गप्पा पण तिच्या विषई कधीही विचारणा केली नाही. कारण इथल्या लोकाना त्यांच्या विषई प्रश्न विचारू नये ते शिष्टाचारात बसत नाही आणि त्यांना पण ते आवडत नाही.

तिनेच एके दिवशी आम्हास तिच्या बद्ल माहिती दिली तिचे नाव जेनिफर आहे व जेनी म्हणूंच तिला ओळखतात ती ज्या बाळाला रोज खेळवते ते तिचे च बाळ नाव ग्याबरीयाला. धक्का बसला ! एवढ्या कोवळ्या वयात माता होणे म्हणजे ?...असो , त्यावर आमची प्रतिक्रिया छान !!! एवधीच बस्....

मुलगी आतिशय सुंदर, बाळसेदार गोंड्स,कुणीही सहज कौतुक करावे अशीच होती . इथल्या कायद्या प्रमाणे कोणीही अनोळखी व्यक्ती ने मूलाना हात लावता कामा नये. हे माहीत असल्या मुळे आम्ही दुरूनच कौतुक व तिला खेळविण्याचा प्रयत्न करीत होतो.

सततच्या गाठी भेटीमुळे जेनी बरीच मोकळेपणाने बोलत असे. कदाचित आम्ही तिच्या आजी, आजीबो च्या वयाचे असु म्हणून ती मोकळेपणाने बोलत होती. जेनी साधारण १८ ते २० वयाची असेल घरी परताना विचार मन्थन ,शंका कुशंकाच जाळ वीणत होतो व तर्क, वितर्कावर जेनी चा विचार करू लागलो असं असेल का ? का तसे असेल का ? शेवटी सर्व तर्कच, खरे कळल्या शीवाय ढोस समज करणे व्यर्थ.

दिवसा मागून दिवस जात होते आमचे रोजचे रुटीन पण , अशाच एके दिवशी जेनी ने आम्हास विनंती वजा प्रश्न विचारला की काही तास बेबी सिटींग कराल का ? प्रथम आम्ही गडबडलोच पण सावधपणे सांगितले की मुलाना विचारून मग कळवितो.
कारण आम्ही ह्या देशात विजिटर आहोत. घरी ह्या विषयावर विचार विनिमय करू असे ठरविले की गोडित नकार किवा जेनीस घरी भेटण्यास बोलवावे.

त्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी भेट होताच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर आमचा निर्णय कळविला. जेनी घरी भेटण्यास तयार झाली व लगेच ग्याबरियला ला घेऊन दुस ऱ्या दिवशी आमच्या आली . मुलानी तिची माहिती घेतली व ठरविले की जेनी ग्याबरियला ला आमच्या घरी सोडेल आणि ठरल्या प्रमाणे ती ३/४ तासा नंतर घेऊन जाईल.

एके दिवशी आम्हास आगाऊ सूचना देऊन जेनी ने मुलीस आमच्या कडे सोडून आपल्या कामावर गेली. ग्याबरीयाला चे बेबी सिटींग करणे तसे आम्हास नवीन नव्हते. आता जवळ जवळ तीन, साडे तीनतास होऊन गेले इतक्यात जेनी येईल असे वाटत असतानाच जेनीचा फोन आला म्हणाली काही कारणास्तव तीला उशीर होणार आहे तेव्हा, तीने सांगितले की तिची आई मुलीस घेऊन जाईल. जेनी ने तिच्या आईस आमचा फोन व पत्ता दिला व अगोदर आम्हास सूचना देऊन घरी जाण्यास सांगितले. मनात शंका आली की जर आई ह्याच गावात आहे तर का बरे तिच्याकडे ठेवली नाही मुलीला ? काही तर्क करता येईना असो , आपण मानव धर्म निभावला बस्स.!!....

ग्याब्रीयालाची आजी जवळ पास ५५ ते ६० वयाची आसेल त्या माऊली ने आपली ओळख करून दिली एमी. एकंदरीत एमी बरीच दुखी आसावी असे वाटते ते तीच्या चेहर्‍यावर दिसत होते. गप्पाच्या ओघात भारता विषईची माहिती व काही चुकीच्या कलप्ना त्यांचे निरसन केले. भारतात मुली लग्ना शिवाय एकटे जगू शकतात का ? हा प्रश्न आचानक विचारल्या मुळे थोडे विषयांतर झाले पण परत वाटले की हा प्रश्न एमिने का बरे विचारला.
भारतात मुली आशा प्रकारे राहत नाहीत व जवळ जवळ सर्वच मुली लग्न करतात. त्या वर तीम्हणाली आमची जेनी मुळी लग्नच करायला तय्यार नाही.

जेनी ही तिची सर्वात लहान आणि त्यात कुमारी माता. ज्या मुलामुळे ग्याब्रीयाला चा जन्म झाला तो लग्न करण्यास तय्यार आहे पण, जेनीच नकार देते. जेनीचा लग्नास नकार आणि तेही ह्या अवस्थेत असताना ? आश्चर्याचा धक्का बसला व विचार आला की आपल्या कडील मुली प्रेमात फसतात व त्यांच्या जिवनाची होत असलेली परवड व आत्महत्या अशा अनेक गोष्टी व अनेकांचे अनुभव अनुभवले.
इथे तर उलटाच प्रकार दिसला. ज्याच्या पासून मूल झाले तो लग्नास राजी असताना जेनी नाही म्हणते म्हणजे तिचा विचार काय?

कारण विचारले तेव्हा कळले की जेनी चा लग्न संस्थेवर अजिबात विश्वास नाही. ती म्हणते की प्रेम हे खोटे असते . तीच्या मते स्त्री व पुरूष हे अगदी भिन्न प्रकर्तीचे असतात व आपापले वेगळेपण दर्शवितात. फक्त मूल होण्यासाठी एकत्र येण्याची अवष्कता असते.

जगात कुठेही जा सगळा समाज व पुरूष सारखाच आहे त्याला फक्त स्त्रियानी त्यांची ताबेदारी करावी असेच गृहीत धरले जाते. तिला ह्या समाजाची सर्व बंधने झुगारयाची आहेत. जेनीचा उदरनिर्वाह कसा चालतो ? तर ती एका फ्हाइव स्टार हॉटेल मध्ये चांगल्या पगारावर् रात्रपाळीची नौकरी करते व बर्‍यापैकी मिळवीते.

जेनी दिवसभर मुलीला सांभाळते व रात्रीची आमच्याकडे सोडते. त्याचे मला पैसे मोजते कारण ती म्हणते की कोणाचेही उपकार नकोत. हे सर्व आता चांगले चालले आहे पण, असे वाटते ती तरुण आहे व तारुण्याची रग ओसरेल तेव्हा वयाच्या त्या वळणावर तिला जोडीदाराची उणीव भासु लागेल तेव्हा !!आणि तिला म्हणावा तितका जगाचा अनुभव पण नाही व प्रगल्भता ही नाही.

पैशा व्यतरीक्त जगण्यासाठी इतर बर्‍याच गोष्टींची अवशक्यता असते . मनात प्रश्न आला लैगिक भावनाच काय ? ह्या मनातील प्रश्नाच उत्तर एमी ने न विचारताच दिले . ती म्हणाली ह्या आजकालच्या मुली स्वछन्दि व बेताल झालेल्या आहेत. त्याना ज्याच्या बरोबर जावेसे वाटले की मागचा पुढचा विचार न करता जातात , जशी पोटाची भूक तशीच लैगिक भूक. एमी मोठ्या पोट तिडकेने बोलत होती. त्यातून तिच्या वर झालेले संस्कार दिसून येत होते. इतक्यात फोनची घंटा वाजली जेनीचा होता विचारत होती की मुलीला घेऊन गेली का ? एमीने हातानेच खुणविले की गेली असे सांगणे.

दुसऱ्या दिवशी बागेत जेनीची भेट झाली तिने मुद्यालाच हात घातला म्हणाली की काल आईने तुमच्या जवळ मी लग्न करीत नाही असे सागितले आसेलच,
ती सारखी माझ्या मागे भुण भुणते म्हणूनच मी तिच्या पासून वेगळी राहते. ती म्हणाली आपली ओळख झाल्या पासून तुम्ही कधी ही माझ्या व माझ्या मुली विषई विचारले नाहीत म्हणूनच मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलते . कदाचित माझे विचार बंडखोरीचे वाटतील पण हे कोणी तरी करायला हवेच ना ?

पुर्वी च्या काळी त्या समाजास लग्नाची गरज होती कारण स्त्रिया पुरुषावर सर्वस्वी अवलंबून होत्या पण ह्या काळात तशी परीस्थिती नाही . मला जगाला व पर्यायाने समाजाला दाखवून द्यायचे आहे की, एकटी श्त्री विना लग्नाची राहून आपल्या बाळाला वाढवू शकते व त्या योगे लग्न संस्था किती कुचकामी आहे हे दाखवून देईन. या पुढे हा माझा वंश आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. सर्व स्त्री व पुरूष समान आहेत कोणी कोणावर बंधन लादु शकणार नाहीत.

जेनी चे विचार व द्रढ निश्चय पाहून वाटले की ही मानसिकता व ही बंडखोर वृत्ती किती मुलींमध्ये असेल. ह्यामुली परिस्थितीचा कश्या प्रकारे सामना करतील आणि आपले जिवन कसे सुखमय बनवतील. हें येत्या काहीं वर्षात दिसून येईल तेव्हाच कळेल कि, कितीजणी ह्या वावटळीत सही सलामत उभ्या आहेत.


अशी होती आम्हास भेटलेली....... बंडखोर जेनी............

1 टिप्पणी:

vaibhav_sadakal म्हणाले...

....पण ह्या वावटळीत तग न धरणार्या मुलींच काय
होणार, त्यांच भविष्य अंधकारमयच असणार नाही का ?