शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

भारताच्या राजादुतांची ज्याक्सन एअरपोर्ट वर कसुन तपासणी...........साडी नेसल्या मुळे .

गेल्या आठवडयाची ही घटना तशी गंभिरच आहे भारताच्या राजदूत श्रीमती मीरा शंकर याना अमेरिकेच्या मेसिसिपी स्टेट युनिवरसिटित " जागतिक अभ्यास " या परी संवादात भाषण देण्यासाठी आमन्त्रित करण्यात आले होते.

श्रीमती मीरा ह्याना कार्यक्रम अटोपल्या नंतर ज्याक्सन शहर पोलिस ह्यांच्या स्वरक्षणात ज्याक्सन-एवेर्स इंटरन्याशनल एअरपोर्टवर नेण्याची व्यवस्था केली. श्रीमती मीरा ह्याना बाल्टिमोर ची फ्लाईट घ्यावयाची होती.

मिस्टर रेड वाणी ( मिसिसिपी स्टेट एजुकेशन डिपांर्टमेंट हेड )
त्यांच्या माहिती प्रमाणे त्यां दिवशी श्रीमती मीरा ह्याना एअरपोर्टच्या अति महत्व च्या व्यक्ती साठी असलेल्या गेस्ट रूम मध्ये कडक सुरक्षेत बसवण्यात आले. इतकेच नाही तर ज्याक्सन पोलिसांनी एअर पोर्ट पोलिसाना ह्याची संपूर्ण माहिती दिली. विमानात चढण्या पूर्वी सुरक्षा तपासणी साठी मीरा उभ्या असताना त्यांना तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी रांगेतून बाजूस काढले व एका महिला सुरक्षा अधिकारीनि त्यांची संपूर्ण ( अंतर बाह्य ) सर्वांगाला हातानी तपासणी केली कारण काय तर त्यांनी साडी परिधान केली होती व त्यामुळे संशईत होऊन तपासणी केली ज्यास अमेरिकन भाषेत " प्याट- डाउन " म्हंटले जाते.

खुद अमेरिकन लोक सुद्धा ह्या अश्या तपासणीस विरोध केला कारण अश्या सुरक्षा तपासणीस "हाताळणी " शिवाय दुसरे नाव संयुक्तिक ठरणार नाही.विमान तळावरील एका प्रत्यक्ष दर्शिने सांगितले कि टी.यस.ये. ( ट्रान्स पोर्ट सेंक्यूरिटी एजन्सी ) सदस्यांनी जवळ,जवळ श्रीमती मीरा यानां रांगेतून खेचून तपासनीस नेले. काय हा उद्दामपणा अमेरिकन सेक्युरीटीचा कोणतेही प्रोटोकोल न पाळता एखाद्या राजदूतास अशी वागणूक द्यावी ? भारत सरकार याचा जाब अमेरिकेस विचारेलच ?

खरें तर अश्या अति महत्वाच्या व्यक्तींची चौकशी किवां तपासणी करण्या बद्दल काहीं मापदंड असतात . ह्या प्रकारची तपासणी एका उच्चस्थ राजनीतिक राजदूत बरोबर करणे आणि तेही तीन महिन्यात दोन वेळा असे घडते .....धिक्कार आहे....!!!!

तेथील सुरक्षा अधिकारी वरून निर्लज्जपणे मिडिया समोर निवेदन करतो कि " हें सर्व काहीं आमच्या टी. यस. ये. च्या नियमानुसार तपासणी केली गेली व त्यातून काणत्याही राजनीतिक व्यक्तीस सूट दिली गेली नाही "
ह्याच नियमाने जर भारतीय सुरक्षेने अमेरिकन राजनीतिक व्यक्तीं बरोबर केली तर......

ही तपासणी कोणाच्या आदेशां वरून करण्यात आली व यां अश्या थारा पर्यंत कां केली गेली ? अमेरिकन सुरक्षेचा प्रश्न आहे तर राजनीतिक व्यक्तींची कशी तपासणी करावी ह्याचे काहीं नियम आहेत. पण सर्व नियम धाब्यावर बसवून मस्तखोर सुरक्षा अधिकारी आपली मनमानी चालवलेली दिसते? अहो. जिथे आपल्या राजदूताची ही अवस्था तर इथें येणाऱ्या भारतीय महिला ज्या बहुतेक साडी नेसतात त्यांचे तर हाल विचारायलाच नको .

मेसिसिपी युनिव्हर सिटी च्या कडून श्रीमती मीरा शंकर यांना दिलगिरी व्यक्त केली तरी पण अमेरिकन प्रशाशनाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.भारताने या घटनेचा निषेध अमेरिकन वकिलातीत नोदविला पण आत्ता पर्यंत अमेरिकन राजदूत ह्यांची काहीच प्रतिक्रिया नाही, का गप्प आहेत ?

जगातल्या सर्व थरातून यां घटनेचा धिक्कार व्हायला पाहिजे जेणे करून अमेरिकन प्रशाशन जागी होईल. आणि त्याच बरोबर ही घटना आज भारताच्या राजदूता बरोबर घडली ती कोणत्याही अन्य देशाच्या बाबतीत ही घडेल.म्हणून सर्व जगाने अमेरिकेवर दबाव आणावा तसेंच अमेरिकन नागरिकांना ही ह्या घटनेची चिड यावी कारण बदललेल्या नियमाने ते पण त्रस्त आहेत. अमेरिकन सुरक्षा एजन्सीना पण संदेश मिळायला हावा जी वागणूक आम्हास मिळेल तीच तुम्हास पण मिळेल.भारत काहीं तुमचा मांडलिक देश नाही... सर्व भारतीय ह्यां घटनेचा शतवार धिक्कार ......धिक्कार ......धिक्कार......करतो.


मा.नां.बासरकर

नोट :- आताचं हाती आलेल्या बातमी नुसार श्रीमती हिलेरी क्लिंटन यांनी खालील प्रमाणे निवेदन दिले.

" We obviously are concerned about it. We will be looking into it and trying to determine both what happened and what we could do to prevent such incidents in the future,” Secretary of State Hillary Clinton

1 टिप्पणी:

sharayu म्हणाले...

अमेरिका हा उर्मटांचा देश आहे हे सर्वज्ञात आहे. त्या देशाशी फक्त सोयीपुरतेच संबंध ठेवले जाऊ शकतात. आपला आदर राखला नाही म्हणून आकांडतांडव करण्याने आपलीच शोभा होईल. जैतापूरचे कॉन्ट्रॅक्ट फ्रान्सला दिल्याचा हा राग असू शकतो.