मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

जगातील दहा धोकादायक,आक्रमक आणि भयानक जातीचे श्वान ( कुत्री ).........


कुत्री म्हणताच आपणास आठवतो तो इमानी, माणसाळलेला प्राणी . कोणी असा कसा विचार करेल की   हा प्राणी एक भयंकर व आक्रमक असेल ,पण दुर्दयव्याने काही जातीचे कुत्री जर त्यांना योग्य प्रशिक्षण ,प्रेमाने जोपासले गेले  नाही तर मग त्यांची निपज धोकादायक होईल. अशी जात निर्माण होण्यामागे बरीच करणे असु शकतात पण , त्यांची जनन आणि कोणत्या प्रकारची काळजी घेऊन ह्या कुत्र्यांचे पालन पोषण आणि प्रशिक्षण दिले जाते त्यावर अवलंबून आहे.

आश्या  प्रकारच्या धोकादायक ,आक्रमक ,व  भयानक कुत्री जगात अस्तित्वात आहेत त्या पैकी आपण दहा जातीच्या श्वाना सिम्बन्धी जाणून घेऊ या .


१)  द ग्रेट दाने    (The Great Dane  ) .........





Image result for the great dane dog

हा प्राणी खर्या अर्थाने शरीराने अतिशय मोठा व ह्याचे  हृदय पण आकाराने मोठे असते. जरी हा प्राणी प्रेम करण्या जोगा असला तरी त्याचा आकारमान आणि वजनामुळे भयंकर मोठा असतो .काही तर ५ फुटापेक्षा जास्त असतात. ह्या जातीच्या श्वानांना जर नीट प्रक्षिक्षण दिले गेले नाही तर त्यांच्या अंगस्वभावामुळे ते धोकादायक ठरतात .


Image result for the great dane dog





२) बॉक्सर ( Boxer ).......


हा प्राणी अतिशय कुटुंब वच्छल ,सांभाळ करणारा आहे. हा पहरेदार , रक्षक आहे वेळे प्रमाणे हा हल्ला पण करतो म्हणून ह्या जातीचे श्वान धोकादायक म्हणून ओळखले जातात . खरे तर हा श्वान निष्ठावान ,ईमानी व काळजी घेणारा आहे पण ह्याचे मुख बैला सारखे असल्या कारणाने ओंगळपणा आहे.



Boxer





३) वुल्फ हायब्रीड  ( Wolf Hybrid )



हा प्राणी जगातील एक अतिशय धोकादायक व घातकी श्वान समजला जातो . ह्या जातीचे म्हणजे संकरीत किंवा मिश्र पैदास केलेल्या कुत्र्यांना जर काळजीपूर्वक प्रशिक्षण दिल्यास ही माणसाळतात .पण त्यांचा मूळ गुण जो जातीवरच जातो तो त्यामुळे त्यांना घातकी म्हणून ओळखले जातात


Wolf Hybrid



४)  अलास्कन  मलमुटे  ( Alaskan Malamute  )



हा अलास्काचा राष्ट्रीय प्राणी आहे.  तो अतिशय भयंकर ,घातकी तसेच तात्काळ झेप घेणारा कुत्रा आहे.
हा लहान प्राण्यांना  अतिशय असहनशील व दहशत दाखवणारा आहे. हा प्राणी श्वान नाही तेव्हा पाळीव प्राणी म्हणून पाळण्यास योग्य समजत नाहीत .



    Alaskan Malamute



५) हुस्की ( Husky  )



हा प्राणी बर्फाच्या गाडीला जुंपण्यात येतो व त्यामुळे बर्फाळ  भागात आवागमन होते.  ह्या प्रकारचे श्वान  Alaskan Malamute  प्रमाणे भयंकर व घातकी आहेत . हे कुत्री मुळात कामसु असल्यामुळे याना लाडका प्राणी म्हणून घरात बाळगत नाहीत .


Husky



६) डॉबरम्यान प्रिन्सचेर ( Doberman  Pinscher )





हा श्वान दिसायला सुंदर आणी रेखीव असला तरी श्वांनीय जाती मधील अत्यंत घातकी ,हल्लेखोर प्राणी आहे. ह्याच गुणां मुळे ह्याला पसंती दिली जाते . जसा हा इतरांसाठी घातकी ,हल्लेखोर आहे तसाच कांही वेळा हा आपल्या मालकांवर पण धावुन जातो .




Doberman Pinscher





७)  जर्मन  जगटेर्रीर  ( German Jagdterrier   )



हा श्वान दिसायला लहान, पण सर्वात धाडसी (शूर ) म्हणून ओळखला जातो. हा ईमानी तसाच मित्रवत ,
ज्यास्त  संरक्षषणात्मक व घातकी आहे. सर्व श्वान जातीमध्ये हा  शिकारी कुत्रा   बुद्धिमान , हुशार ,असा मानला जातो  म्हणूनच ह्याला  “The Spartan dog”.असे संबोधतात .


German Jagdterrier


८) रोतत्वेहीर (  Rottweiler  )


हा प्राणी अतिशय घातकी ,अतिशय तडफदार ,नेमका झडपणारा आहे. ह्या जातीच्या श्वानांना पाळीव प्राणी म्हणून वाढवताना बरीच सावधानी बाळगावी लागते . हा श्वान आपल्या जननजाती प्रमाणे मूळच्या अंगस्वभावामुळे  आक्रमक वृत्ती , व कुरापती काढण्याच्या स्वभावामुळे हा लहान प्राणी व लहान मुलांसाठी  अतिशय घातकी,धोकादायक बनतात .



Rottweiler




९)  जर्मन  शेफर्ड  ( German Shepherd )



हा प्राणी  प्रचंड शक्तीचा ,राक्षसी वृत्तीचा ,आणि बुद्धिमान असल्यामुळे ह्यांना पोलीस दलात ज्यास्त मागणी असते कारण  हे रखवाली, तसेच वेळ प्रसंगी अत्यंत आवेगाने झेपावतो आपल्या सावजावर. हा प्राणी जवळ असताना कोणीही निष्कजी राहुच शकत नाहीत .


German Shepherd



१०)  पिट बुल (बैल)  ( Pit Bull  )


हा श्वान दांडगा धिप्पाड जातीचा कुत्रा मास्टिफस ( mastiffs ) व ( terriers  ),  टेररियर्स  ह्या दोन प्राण्या पासून  संकरित पैदास केलेले आहे.  ह्या दोन्ही प्राण्याच्या विशेष गुण वैशिष्ट्यामुळे ह्यांची संकरित जात  निर्माण केली  .मास्टिफ  हा दांडगा ,ताकदवर  धिप्पाड जातीचा कुत्रा आणि  टेररिएर हा भयंकर , सक्रीय , बुद्धिमान आणी चौकस असा प्राणी आहे. ह्या दोहोंचे गुण ह्या संकरित श्वानांत आलेले असल्यामुळे हा पोलीस श्वान तुकडीत आग्रहाने समाविष्ट केला जातो.
बऱ्याच देशांत ह्या प्राण्यावर बंदी आहे पण काही लोक ह्यास युद्धभूमीवर उत्तम कामगिरी करणारा दुश्मनाचा कर्दनकाळ म्हणून सैन्यात भरती करण्याचा आग्रह धरतात

Image result for pitbull dog



Image result for pitbull dog



=================================================

माहिती व छायाचित्रे  मायाजालावरून  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: