शनिवार, २८ एप्रिल, २०१२

भारत-पाक अणु युद्धामुळे जागतिक दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल ?



...........एक पाहणी निष्कर्ष .


जर  भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये युद्ध पेटले व त्यांत अणु बॉंम्ब वापरले गेले तर त्याचे परिणाम फक्त ह्या दोन देशांच्या अवति  भवतालच्या प्रदेशा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगात त्याचे परिणाम दिसतील.






ही लढाई ( युद्ध ) जरी आशिया खंडात होत असेल तरी पण जगात याचा परिणाम दिसेल व त्या मुळे जागतिक दुष्काळाची भीती उद्दभवते व हें युद्ध त्यासं कारणीभूत ठरेल.
 
 
 
 
 
 
सध्याची चाललेली आण्विक शश्त्रांची चढा ओढ व आण्विक मिसाईल याचा पल्ला जास्तीत जास्त कसा नेता येईल ह्या दोन देशामध्ये पाहण्यात येते. ही आण्विक शस्त्रे अतिशय विषारी असतील जें संपूर्ण जागतिक पर्यावरण संतुलन बिघडण्यास कारणीभूत होतील. सर्व जगाचे हवामान दुषित होईल व परिणामी अन्न ,धान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होईल.
 
 
 




अमेरिका ,चीन, रशिया, युरोप आणि आशियाई देशांत  ह्या आण्विक स्फोटा मुळे वातावरण दुषित होण्याची शक्यता व त्याचे बळी ठरतिल असे डॉं. इरा  अलफंड   ( Dr. Ira Aelfand )  Intarnational Physicions for Prevantion   of Nuclear War  यांचा निष्कर्ष आहे.
 
 



डॉं. इरा अलफंडच्या म्हणण्या प्रमाणे  ह्या दोन देशातील युद्धात जरी थोड्या प्रमाणात आण्विक शात्रांचा उपयोग झाला तरी त्याचे दुरगामी परिणाम संपुर्ण जगाचे  प्राकृतिक संतुलन  ( ecosyastem ) बिघडेल व त्यामुळे असंख्य लोक सकस अन्ना अभावी दगावण्याची शक्यता निर्माण होईल. ह्या दोन्ही ( भारत-पाक ) देशांनी प्रयत्न केले पाहिजे कि त्यांनी अशी युद्ध  परस्थिती निर्माण करू नये असे आवाहन डॉं. इरा अलफंड  यांनी केले आहे.
 
 



डॉं. इरा अलफंड  म्हणतात कि ह्या आण्विक दुषपरिणामाची व्याप्ती इतकी मोठी  दुरगामी  व परिणामकारक असेल जी मानव इतिहासात सर्वात जास्त विनाशक म्हणून नोद होईल.





खरी भीती अशी कि कदाचित ही संपूर्ण मानव संस्कृतीच नष्ट होईल कि काय ? छोट्या प्रमाणात जर आण्विक शस्त्रे वापरली तर येव्हढे घडेल तर महायुद्धात सर्व वापरली गेली तर किती जगात आहाकार माजेल याची कल्पनाच करणे कठीण आहे.
 
 
 




हा निष्कर्ष Journal Climate Change यांत अद्याप प्रसिद्धीस देण्यात आला नाही पण, World Sammit of Nobel Lauretes ,शिकागो  या संगोष्टीत ठेवण्यात आला .ह्या रिपोर्ट मध्ये असे भय व्यक्त करण्यात आले कि आण्विक शस्त्रे जगातील देश एकमेका विरुद्ध वापरले तर त्याचा परिणाम सबंद्ध  जगातील अन्न उत्पादनावर होईल.
 
 
 




अमेरिकन " कॉ र्न " उत्पादन १० टक्क्यांनी कमी होईल,सर्व जगातील उत्पादन अश्याच पद्धतीने हळू हळू १० टक्क्या पेक्षा जास्त कमी होत जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली . ही स्थिती जेव्हा जगातील आण्विक युद्ध चालू असेलची असेल पण एकदा युद्ध संपले कि त्या नंतर पांच वर्षात त्याचे अधिक तीव्र व भीषण परिणाम दिसु लागातील  व हळू हळू हें प्रमाण वाढत जाऊन संपूर्ण जग दुष्काळ ग्रस्त होईल.
 
 
 




ह्या परिणामाकडे पाहता जगातील अनेक राष्ट्रे अणुयुद्ध होऊ नये ह्याचा प्रयत्न करताना दिसतात अन्यथा मानव जातच संपूर्ण नष्ट होण्याची भीती आहे .

शिकागो ( अमेरिका ) इथें  होणाऱ्या जागतिक समिट मध्ये सर्व जगास इशारा वजा विनंतीचा ठराव " आण्विक युद्ध टाळा " पास केला जाईल..   












----------------------------------------------------------------------------


  टाईम्स ऑफ इंडिया ( आर्टिकल ) व गुगल इमेजसच्या साह्याने .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: