सकाळचे वर्तमान पत्र उघडताच भ्रष्टाचाराच्या बातम्या ह्याची पण आपणास सवय झाली. प्रत्येक जण त्यां बद्दल बोलतो पण सध्याच्या बिघडलेल्या परिस्थिती मध्ये कोणीही कसलेही पाऊल उचलणयास धजत नाही.
भ्रष्टाचार हा काहीं भारतातच आहे असे नाही तर सबंध जगात तो बोकाळ लेला आहे. जर का देशाची प्रगती सर्वांगीण साधायची असेल तर सरकारला भ्रष्टाचार रुपी राक्षसास समूळ नष्ट करावे लागेल. त्या साठी काहीं कठोर पावले उचलावी लागतील तसेंच वेळ पडल्यास स्वकीयावर कारवाई करण्यास कुचराई करतां कामा नये .
गेली ६० वर्षे आपण बघतो आहोत कि हा भ्रष्टाचार रुपी राक्षस असा वाढला कि त्याला मारणे किवां काबूत ठेवणे पण कठीण होऊन गेले. ह्या चें मुळ कारण देश भक्ती,सदाचार, सच्चेपणा, निष्कलंकता , आत्मीयता ,जिव्हाळा,तसेंच निस्वार्थ बुद्धी अशा सर्वच गुणांचा झालेला ऱ्हास.सध्याची बदललेली राजकीय समीकरणे , राजकीय नेते,सरकारी अधिकारी,प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष व ईतर उच्च पदावर असलेले प्रतिष्ठीत ह्या सर्वांची स्वहित जपण्याची प्रवृत्ती त्यामुळे सगळीकडे भ्रष्टाचार माजलेला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सरकारी क्षेत्रात पारदर्शकता व आकाउंटीबिलीटी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहे ती जर अमलात आणली तर, हा भ्रष्टाचार चा राक्षसास समाप्त करणे कठीण जाणार नाही.जगात अशी पण उदाहरणे आहेत कि जेव्हा भ्रष्टाचाराचा विळखा सर्वत्र पसरला तर जनतेस जगणे अशक्य होऊन जाते तेव्हां ,जनतेचा राग कोणीही थांबू शकणार नाही. सर्व भ्रष्टाचारी मंडळींची काय गत होईल ते देवच जाणे.
भारतीय जनता फारच शोशिक आहे पण कां एकदा त्याचा अंत झाला कि मग परिस्थिती काहीं वेगळीच होईल. तेव्हां सर्व राजकर्त्यांनी,सरकारी अधिकारि,आणि उच्च पदस्थ लोकांनी वेळीच सावध होऊन स्वहित जपणे सोडले पाहिजे नसता लोक क्षोभास समोरे जावे लागेल हें पक्के.
भारत सरकारने मग ते कोणत्याही पार्टीचा कां असेना UNO convention against curruption चा
ठराव कडकरीत्या आमलात आणले पाहिजे व आपल्या राजकारणी नेत्यांनी " स्वहित " बाजूला सारून किवां त्यागून जनतेच्या भल्यासाठी ,देश प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्या कामात पारदर्शकता, जवाबदारी च्या भावनेनी वागले पाहिजे नसता पुढचा काळ त्यांचा अंधारमय होईल.
जगातील काहीं देशांनी आपला कारभारात पारदर्शकता व जवाबदारीने करून आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर आणल्याची उदाहरणे आहेत. डेन्मार्क,न्यूझीलंड,आणि सिंगापोर ह्या देशांनी कठोर कारवाई, पारदर्शकता,जवाबदार वृतीने काम करून भ्रष्टाचाराचा नाश करून जागतिक क्रमवारीत वरच्या कृमंकावर जाऊन पोहचली आहेत. ह्या वरून असे दिसून येते कि स्वछ राज्य कारभार, लोक उपयोगी कामे, आत्मीयता,आणि देशासाठी समर्पण भावना ठेऊन राष्ट्र हिताची कामे केली तर टप्या , टप्याने भ्रष्टाचार रुपी राक्षसाचा नाश करणे साध्य होईल.
वर उध्रत केल्या प्रमाणे जागतिक भ्रष्टाचारचा आलेख व क्रमवारी Transparancy International ह्या संथेने जगातील १७८ राष्ट्राचा अभ्यास व पडताळणी करून एक अहवाल तय्यार केला आणि त्यांत सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे व सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे ह्यावरून त्यांनी सर्व देशाची क्रमवारी केली. कोण कोणती राष्ट्रे किती भ्रष्टाचारी आहेत ते ० ते १० यां माप पट्टी ने मोजून क्रमवारी दिली आहे. आपणा साठी तो आलेख व माप पट्टी कृमांक देत आहे. ह्या क्रमवारीत भारत देश ( इंडिया ) ८६ कृमंकावर आहे व माप पट्टी मध्ये भ्रष्टाचार मोजणी ३.३ आहे.
आपण आशा करुया कि भारतीय राजनीतिक नेते ह्या पासुन काहीं शिकतील व आपला देश पण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त होईल.
राष्ट्रे जागतिक माप दण्ड पट्टी
क्रमांक. ( 0 ते 10 ) * -------------------------------------------------------------------------------------------------------------
1 डेन्मार्क, न्यूझीलंड , सिंगापूर. १ ९.३
2 फिनलंड ,स्वीडन . ४ ९-२
3 क्यानाडा. ६ ८.९
4 निदेर्लंद. ७ ८.८
5 आस्ट्रेलिया ,स्वित्झर्लंड . ८ ८.७
6 नार्वे १० ८.६
7 आईसलंड,लग्झाम्बर्ग. ११ ८.५
8 होंग कोंग १३ ८.४
9 आयर्लंड १४ ८.0
10 आंस्ट्रीयां,जर्मनी . १५ ७.९
11 बार्बाडोस , जापान . १७ ७.८
12 कत्तार. १९ ७.७
13 युनैटेड किंग्डम . २० ७.६
14 चिली. २१ ७.२
15 बेल्जीम , युनैटेड स्टेट्स. २२ ७.१
16 उरुग्वे . २४ ६.९
17 फ्रांस . २५ ६.८
18 इस्तोनिया. २६ ६.५
19 साल्वोनिया. २७ ६.४
20 सायप्रस , युनैटेड आरब येमिरीटस. २८ ६.३
21 इजारैल ,स्पेन. ३० ६.१
22 पोर्तुगाल. ३२ ६.०
23 बोट्स्वाना,पोस्ट्रो रिको , तैवान . ३३ ५.८
24 भूतान ३६ ५.७
25 माल्टा ३७ ५.६
26 ब्रुनैल ३८ ५.५
27 कोरिया (साऊथ),मौरितीस. ३९ ५.४
28 कोस्टारिका ,ओमान, पोलंड , ४१ ५.३
29 डोमिनिका. ४४ ५.२
30 केप वेर्डे ४५ ५.१
31 लिथुनिया ,मकाऊ, ४६ ५.०
32 बाहरीन . ४८ ४.९
34 सेचीलास . ४९ ४.८
35 हंगेरी, जोर्डेन , सौदी अरेबिया. ५० ४.७
36 झेक रिपब्लिक, ५३ ४.६
37 कुवैत . साऊथ आफ्रिका ५४ ४.५
38 मलेशिया,नामिबिया, तुर्की, ५६ ४.४
39 लाटेविया, स्लोवाकिया , ट्युनेशिया. ५९ ४.३
40 क्रोटीयां, FYR म्यासिडोनिया, ६२ ४.१
41 घाना, सामोअ.
42 रावांडा, ६६ ४.0
43 इटाली ६७ ३.९
44 जॉर्जिया ६८ ३.८
45 ब्राझील, कुबा, मोन्टेनेग्रो,रोमानिया. ६९ ३.७
46 बल्गेरिया, यल साल्वाडोर, पनामा, ७३ ३.0
47 त्रिनिदाद-तोब्यागो. वानू आतु .
48 चायना ,कोलंबिया, ग्रीस, लेसेथो, ७८ ३.५
49 पेरू, सर्बिया, थाईलंड.
50 अल्बेनिया, इंडिया, जामैका ,लिबेरिया ८७ ३.३
51 बोस्निया, हर्जेगोविनिया,डीजी बौटू, ९१ ३.२
घाम्बिया, गोटेमाला, किरिबाटी,
श्रीलंका, स्वाझीलंड.
52 बुर्कीना फेसो , इजिप्त, मक्सिको ९८ ३.१
डोमेनीकन रेपाब्लिक, सओटोमे प्रीन्सिपी
53 टोंगा, झांबिया. १०१ ३.0
अल्जेरिया,अर्जीनटीना, कझाकस्तान,
54 माल्डोवा, सिनेगल. १०५ २.९
बेनीन, बोलिव्हिया, गाबोन,
55 इंडोनेशिया,कासावो, सोलोमोन आईसलंड . ११० २.८
इथोपिया, ग्वियाना ,माली,
56 मंगोलिया, मोझांबिक, टांझानिया,वियतनाम. ११६ २.७
वियतनाम.
57 आर्मेनिया, एरितेय,मादागास्कर,निगार. १२३ २.६
58 बेलारस, इक़्वाडोर, लेबनोन, निकारागुआ १२७ २.५
सिरीया,तिमोर-लेस्ते, युगांडा,
59 अझरबेजान, बांगलादेश, होन्डुरास, नैजेरीया, १३४ २.३
फिलिपाइन्स,सिअरा लेओन,टोगो,
उक्रेन, झिम्बग्वे. नैजेरीया,
मालदीव, मौरीतानिया, पाकिस्तान,
60 केमारून, कोटे दिल्वारे, हैत्ती, इराण, १४६ २.२
लिबिया, नेपाल पुरुग्वे, येमन
61 कंबोडिया, सेन्ट्रल अफरीकन रिपब्लिक, १५४ २.१
कांगो-ब्राझाविला, गियाना-बीस्साऊ,
केनिया, लाओस, कोमोरास,
पापु न्यू गियाना,रशिया, ताजिकिस्तान .
62 डेमोक्राटीक रिपब्लिक आफ द कांगो, १६४ २.०
गुइनिया,
63 अंगोला, इक्वटोरिअल गियाना. १६८ १.९
64 बुरुंडी १७० १.८
65 चांद १७१ १.७
66 सुदान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान. १७२ १.६
67 इराक . १७५ १.५
68 अफगानिस्तान, मायनामार, १७६ १.४
69 ख्र्गेरीस्तान, वेनेझुअला. १७८ १.१
सोमालिया.
*(नोट:-- माप दण्ड पाट्टीवर "0" म्हणजे सर्वात जास्त भ्रष्टाचारी व "१०" म्हणजे सर्वात कमी भ्रष्टाचारी राष्ट्र )
संगृहीत ...........
============================================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा