बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

महाकवी कालिदास रचित " रघु वंश "

  1. रघुवंश सर्ग ३           ( वृत - - वंशस्थ )
तदा पतीच्या आभिलाष पुरणा /

साखिचीया लोचन मुख्य तोषाणा /

इक्ष्वाकुच्या संतती आदिकारणा /

सुदक्षीणा दावित गर्भलक्षणा // १ //
 

शरीर ही क्षीण बहून भूषणे /

दिसे तदा पांडूर वर्ण आनने /

अंधूक तेजे मित तराकाम्बरी /


प्रभातीच्या चंद्रयुता निशेपरी // २ //

तिच्या मुखीचा मृदुगंध सेवुनी /

दिलीप एकांती नतृप्त हो मनी /

न धाय जैसा गज पल्वेले वनी /

वर्षा गमीच्या जलबिंदू वर्षांनी // ३ //


महिंद्र जैसा सूर-राज्य भोगतो /

तत्पुत्र व्हाया भुव-राज्य भोगितो /

म्हणोनि त्यागूनी समग्रही रसें /

सुदक्षिणा चाखित मृत्तिका असे // ४ //


लज्जेमुळे सांगत ना मला कधी /

इच्छीतसे काय मनांत मागधी /

इच्छा तिचीजा कळवीत महती /

साखीजना सांगतसे महिपती // ५ //

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: